Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
उभयतांस युत्ध लागलें । हे वर्तमान समग्र हीं शिवाजी राजास कळून त्यांनी सेना सन्नत्ध करून अल्लियदल्शाहावरी चाले करणेस सित्ध जाहले । या दों ठांईचे वर्तमान अल्लियदल्शाहास कळून, अल्लियदलशहानी बेडरचा यजमान बल्लाळ, फत्तेखान, मुसेखान्, या तिघे सरदारांस युत्घ संन्नहा व सेना हीं देऊन शिवाजी राजानी पादशाहीं गड किल्ले बांधिले ते समग्र सोडून शिवाजी राजे आहेत ते स्थळ पुरंदर गडास जाऊन शिवाजी राजास हस्तगत करणें ह्मणऊन निरोपून पाठविले । उपरी त्या त्रिवर्ग सरदारांनीं हीं शिरोबल ह्मणावयाचा गड शिवाजी राजानी आक्रमिला होता तो घेऊन तेथें बेडराची यजमान बल्लाळास ठेऊन फत्तेखान् मुसेखान् दोघे हीं शिवाजी राजे होते त्या पुरंदर गडास वेढा दिल्हें। तेव्हां शिवाजी राजानी आपले सेनापती भीम मण्णारास उबलान फार रागा भरून याक्षणी तुम्ही जाऊन शिरोबलाचा किल्ला घेऊन ठाणे ठेऊन येणें ह्मणुन निरोपून अपण फत्तेखान मुसेखानासी युत्धास सन्नत्ध जाहलें । भीम सेनापति जाऊन शिरोबलाचा किल्यास वेंढून चहूंकडे मोर्चे देऊन तोफखाना नवि बाणाचा मार केले तेव्हां बल्लाळाकडील सेनीक समग्र डोसकें दाखविनासें किल्ल्यांतच दडाले । भीम सेनापतिनीं चहूंकडून किल्ला पाडून हल्ला करून आंत शिरून खतल करण्यांत बल्लाळासे हीं मारून टाकून किल्ला म्वाधीन करून घेऊन आंत आपले ठाणे बसऊन अपण निघून शिवाजी राजाकडे आले । त्यानी पावत्या अगोदरी फत्तेखान मुसेखान् उभयतानीं फौज तयार करून घेऊन पुरंदर गडावरी हल्ला करून फौज चंदन गेले। तेव्हां शिवाजी राजानी वरील किल्यांतून जबर मार करून कित्तेक फौजे कडेलोट करून कित्तेकांस तोफानें व भांड्यानें व बचीनें व तरवारानें मारून व शिसे ताऊन बोतून अैसा जबर मार करून हल्ला परतून सोडविले । तदनंतरें दुसरा किल्ला फत्तेखान् मुसेखान् आपल्या फौजनिशी संधी पाहून येकायेकी पुरंदर गड तमाम चढून जाऊत किल्ल्याचा