Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
तो देश आतां अपण साधुय्ये म्हणून निश्चयेकरून, आपुल्या जाहगीरच्या देशांचे व्याज करून, देवगिरी दुर्ग राज्याखालील अैंशी दुर्ग हीं, शाहनि राजाजी साधून आपले केले । तेव्हा शाहजी राजाची दौलतेची व शौर्याच हीं अधिक्यता पाहून, इतर राजे व सरदार शाण्णौकुळाचे म-हाटे होत, ते समग्र शाहजी राजास मिळाले । त्या शाहण्णौकुळाचा विस्तार थोड जाणवितोः-जे क्षत्रियवंश सूर्यापासून हीं चंद्रापासूनीहीं ब्रह्मदेवापासून हीं वृत्धीतें पावला, ह्मणून भारत. भागवत, हरिवंश रामायण हिं ग्रंथांत विस्तार सांगितले; त्यात सकल वंशास ही मुख्य ब्रह्मदेवापासून । अलीकडे चंद्र सूर्य हे समग्र कारण जाहले। तत्रापी ब्रह्मवंश व सूर्यवंश व चंद्रवंशाचे राजे येकास येक मिळणी हीं आहे । करितां मुख्य ब्रह्मवंशांत मरीच । त्यापासून कश्यप । त्यापासून सूर्यनारायण । त्यापासून वैवस्वत मनु । त्यापासून उतानपाद राजाचे संततींत दांभीक राजा । त्याचे साहा लेंक। त्यापासून राजवंश जाहला आहे । तैसेंच चंद्रवंशांत चंद्राचा लेंक बुध । त्याचा लेंक आयु । त्याचा लेंक नहूष । त्याचा लेंक ययाति । त्यापासून पुरूराजा। त्यापासून राजवंश विस्तारला आहे। त्या त्रिवंशापासून विस्तारली क्षत्रिय कुलै शाण्णौची नावनिशि:-‘भोंसले, घोर्पडे, लिंबाळकर, जगताप, नळर्वेदे, किकाडोश, देसाखतनी, ककाड, फडक, माने, इदल्कर, भिसले, मोहित, शिरके, फडतरे, काळे,अगरे, पुंवार, होल्कर, वणगे, रणनवरे, अटाले, पाहत, शेकर,जादाले, पोळवा, फडसाळ, खेडगळे, बहुगुण, मोरे, सांवत सूर्यवंशी । सोमवंशी यादव, मस्तके, लोखंडे, सिंगाडे, दळवी, घांटगे, सनगर, गायकवाड, देवकर, जाधव, सोनवणे, लांडर, डदारे, पिसाळ, विरजराय, जाहे, भाडलकर, युजाटे, शिशोंग, शिरसाटे, भानदुर्ग, काडे, कराडे, गाळी, गरूड, धावाडे, दुमाल, रणपिश, कापुशे, मटले, ठोके, गुजर, खड, टोन, कुराहे, शळके, शिलार, गाडे, काटकर, माहाडीक, वानविरे, वितरे, वाघमारे, वाघ, ववरे, वाघकल्पाडे, शितोळे, शिकरे, वावर,