Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
फौजदार सरणोबत देवकराचें घराण, व दुसरें फौजदार पोंवाराचें घराण त्या त्रिवर्गास ही नमिलीं कामें : आपल्या घोड्यास व हत्तीस बिरुदें बांधितानां, इतर सामादिक व वर लिहिलेले त्रिवर्ग मुख्य सामादिकांनी हीं बसून बिरुदें उचलून, पोवारांनी पेशवाचे हातीं देणें । त्यांनी देवकराकडे देणें । देवकरांनी बांधणें । व कित्येक बांधवणें हीं येणें प्रमाणें चालविले । याच रीती, ते ते वंशस्थ अद्यापी ते च काम करीत येताती । या खेरीज दुसरीयांस हत्यार धुणें देवकरांनीच धुतलीं । खांस हत्यारें देवकरांनीच आणून महाराजा पाशीं देणें । तदनंतरे, हत्यार पूजिते वेळेस उजव्या बाजूस पोंवार, डाव्या बाजूस देवकर, मध्य महाराज पेशव्यासहीं, घेऊन बसून पूजा करणें । महाराज सिंहासनावरि सदरेस बसल्या वेळेसहीं, उजवी बाजू, डावी बाजूस, वर लिहित्याप्रमाणें, पोंवार, देवकर, पेशवे, पुढें बसणे । येणें प्रमाणें आज्ञापून उरलीं बिरुदें, व हत्तीवरील नौबतपंजा व हत्तीवरील माहीमरात, व हत्तीवरील तास, बिरुदाचे भालबर्ची, निशानें, वगैरे इत्यादि बिरुदे, जिलेबेस व माघिलांगी, यावयाच्या यथाक्रमें कडून चालवीत आले । तदनंतरें, प्रकृत आपले चित्तानुरूप कित्येक बिरुदें आंगिकारिले । त्यांत या महाराष्ट्रदेशास व त्या जातींसहीं मुख्ययान पालखी जाहल्या । करितां त्या पालखीसच लाविली बिरुदें लिहितों :-
पालखीची तबकडा व कमान देखील, हत्तीचे दांताची शिफेद येक रंग; त्यास रेशमी का-हण्या, व नवार रेशमी; दांडीचे पुढिले बाजूस सिंहललाट सोन्याचें, दांडीचे माघले बाजूस शार्दूलवदन सोन्याचें पिंजरीचे शेवटास, दोनी बाजूस जडीत केळीचे फुलाकृति कलश २; पिंजरीचे च्यारी कोनेस जडित गोंडे, जरी झालरी ४; दोन बाजूचे कतरीवरील दांडीस, रुप्याचे खुब्याचे जरी गोंड्याचे घोंस; दांडीस समग्र जडीत खुब्याचे, योखदे सोन्याचे खुब्याचेहीं, भरजरी गोंडे; पालखीत समोर अरसा; वरहीं पालखीयांत दांडीस मोराचा विजणा