Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०० ] श्री. ६ मे १७२८
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलक नाम संवत्सरे वैशाख श्रुद्ध अष्टमी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा. शंभूछत्रपति स्वामी यांणीं राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मांस दोन पत्रें स्वामीनीं यावयाविषयीं पाठविलीं. तुमचेविषयीं स्वामीचे चित्तीं कांहीं संशय असेल तर श्रीची शपथ असे, तुम्हासही श्रीची शपथ असे, ह्मणोन लिहिलें व सांगोन पाठविलें. परंतु तुह्मीं चित्तांतील संदेह दूर केला नाहीं . तरी स्वामिसंनिध यावयास अनमान केला हें तुह्मांस उचित नव्हे. स्वामीस तुह्मांपेक्षां दुसरा अर्थ कांहीं विशेष आहे, ऐसे नाहीं. तुह्मीं मात्र निष्ठुरता धरीत आहे. हें स्वामी हृद्गत तुह्मांस कळावें, व तुमचेही स्वामीस विदित व्हावें, या करितां हालीं राजश्री लक्ष्मणराव शामजी व अंताजी बल्लाळ यांसी आज्ञा करून पाठविले आहेत. हे स्वामीचे आज्ञेप्रमाणें तुह्मांस सागतील, तें चित्तांत आणून याउपर कोणेविषयीं संदेह न धरणें आणि आपलें हृद्गत सागोन पाठविणें. तुमचें ठायी ज्याचा विश्वास असेल, त्यास सांगोन पाठविणें स्वामी त्यांस तुह्मांकडे पाठवितील समाधान असो देणे बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा
मर्यादेय विराजते.