Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
धणीही त्यांचे निष्ठेप्रमाणें भूषणें वाढवितात. जिल्हे मामले देतात त्याजला स्वामिसेवेवितरिक्त दुसरे नाहीं. सुखरुप दौलता खाऊन आहेत. त्यांची साक्षी उपसाक्षी देऊन तुह्मीं लिहिलियानें साम्यतेस येणार नाहीं तुह्मांसही धण्यानीं सरंजाम दिलाच आहे त्यामध्यें तुह्मीं आपले पदाप्रमाणें वर्तोन, धण्याची सेवा करून, कृपा संपादून घ्यावी. तुह्मांवरी धण्यांनीं दया करावी असेंच उभयपक्षीं उचित आहे असा प्रसंग असता तुमचे इस्तकबिलीपासून एकही सुप्रयुक्त वर्तणूक नाहीं. धण्यासच आरोप ठेवून लिहिता, यामध्यें तुह्मांस कोणतें उचित असे ? आह्मां सारिख्यानीं लिहिलें तरी तुह्मांस विषादावह वाटेल ; परंतु तुह्माजवळचे कारकून भले माणूस आहेत. त्यासच ये गोष्टीचा पर्याय विचारणें. तेच तुह्मांस काय ह्मणतील, हे गोष्टीचा प्रत्यय पाहणें. हा आपले जागीं विचार न पाहता, ज्या भरीं भरिता त्या भरीं भरोन कागदपत्र लिहिता, यांत स्वार्थ कोणता ? घोरपडे, सितोळे यांचेज भरी भरोन अव्यवस्थित वर्तणूक करून तप्त केलें. असें असतां तुह्मीं लिहिलें जे, आपले आज्याचे लग्नास लक्ष दोन लक्ष रुपये खर्च करून लग्नें केलीं, सरकारकुन्या दिल्या, ऐसें तीन पिढ्या चालले, आणि आपल्यावरीच निकर्ष धण्याचा । ह्मणोन लिहिलें तरी स्वामिद्रोहपणाची वर्तणूक तुमच्या त्रिपूर्वजात ऐसें कोणांपासून तरी कर्म अवलंबिलें होतें काय ? धण्यांनी लक्ष दोन लक्ष रुपये लाऊन लग्नें केलीं, पदें दिल्हीं, याणीं सेवा केली, त्याचें सार्थक निदर्शनास आणिलें ते वडिल चालत आले त्यांच्या वर्तणुकीप्रमाणे तुह्मीं वर्तावे, राज्याचा बदोबस्त करावा, लोकात कीर्त संपादावी, हें तुमच्या वांट्यास न येता, मनस्वी लोकांच्या बुद्धी ऐकोन त्याचें निदर्शन जे खवारी जाली, दुराचरणाचें निदर्शन तुह्मास आलें याउपरी तरी तुह्मी सर्व अर्थ चित्तात आणून, एकाग्र चित्तें धण्याचे पायाशी लक्ष लावून, धण्याची कृपा संपादून घ्यावी आपण आम्हांस लिहिलेसारखे आह्मास द्यावें. असें मन.पूर्वक आपलें चित्तीं बेकिलाफानें सदेह न धरिता चित्ती असेल तरी त्याप्रमाणे जो विचार कर्तव्य उपयुक्त असेल तें करावें. सारांश, सुमतीस दुर्मतीस तफावत फार आहे । सुबुद्धिदुर्बद्धीचीं फळें नारदमुनींस व मार्कंडेयासी प्रत्यय आला, हें कथापुराणान्तराश्रयें आपण ऐकिलींच असेल. आपलीं पदें महत्त्वें भारी आहेत. याकरितां दुसरियाच्या सांगितल्या बुद्धीवरी जाऊं नये, यांत श्रेयस्कर आहे आपल्यास हे पत्र विस्तारें लिहिलें आहे. जें उपयुक्त असेल तें चित्तांत आणावें. एक भला माणूस येथें नि संशयरूपें पाठवून धण्याशी सख्य करून घ्यावें, यांत उत्तम आहे तरी आपण अगत्यरूपें मला माणूस पाठवून गोडीचा विचार करावा. येविशीं विलंबावरी न घालतां गुप्तरूपें सत्वर पाठवावा. विदित जालें पाहिजे. हे विनंति.