Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
सोबतीच्या लघु मनुष्यांच्या बुद्धीस लागोन नसती कल्पना वाढवून धण्याचा मनसबा नामोहरम केला. स्वामिद्रोह मात्र पदरीं घेतला । तुमचे वडील पंडितमा।रनिले कोणें रीतीनें वर्तले, त्यांचे वर्तणुकीचे निदर्शन तुह्मीं स्वल्पकाळेच दाखविलें. ' राणोजी घोरपडियाची व आपाजी सितोळ्याची स्पर्धा वाढली', ह्मणोन लिहिलें. तरी ते जालें तरी मराठे माणूस, तुह्मीं सरकारकडून, तुमचे वक्रानें त्याणी वर्ताणें, कोणीं बदराह वर्ततील तरी तुह्मां लोकांनीं बुद्धिवाद सांगावा जे, धण्यासी हे अमर्यादा कार्याची नव्हे, परिणाम लागणार नाहीं. असें सांगावें. ऐसें तुह्मां लोकांच्या नीति असोन, हे एकीकडे ठेऊन, ते आपण एक होऊन, धन्यासी बळी बाधिली. वल्गनाही मन पूत केल्या. प्रांतांत उपद्वाप केला. हाच मुलूक मारिला रयत देशांतरास उठोन गेली जवळचे चार हुजरे होते त्याचे गांवखेडियांचे निसंतान केलें. धण्यासी केवळ प्रतिमल्लतेचाच प्रसंग जाहल्यावरी वरकडांनीं चित्तांत आणावेंसें काय ? तत्रापि सेवक जवळचे ह्मणजे लेकरें, यांस क्केश जाहल्यावरी धण्यास ये गोष्टीचें वैषम्य न वाटेसे काय ? तत्रापि धण्यांनीं इतकेंही किमपी चित्तांत न आणितां मागती तुह्मांवरी दया करावी, इतके दिवस वर्तणूक जाली ती क्षमा करावी, या अर्थे एकवेळ रामजी संकपाळ पाठविले. त्या बोलीचा परिणाम काय लाविला ? त्याउपरी सोनजी तांबट पाठविले. तेव्हांही तुमचें चित्त सपक्व जालें नव्हतें. तदुत्तर चिकोडीचे मोकामीं असतां तुह्मांस संकट कोणेंप्रकारचें प्राप्त जाले होते अथवा नव्हतें, हे तुमचे तुह्मी चित्तांत विचारून पाहणें. ऐसा तुमचा संकटाचा प्रसंग धण्यानीं पाहून, तुमचे अमर्यादेचा प्रसंग किमपी चित्ताते न आणितां, कृपाळू होऊन, राजश्री बहिरो व्यंकाजी व रघोजी जाधव या उभयतांस तुह्मांकडे पाठवून, हुजूर आणावें या अर्थे उभयतामा।रनिलेस तुह्मांकडेस पाठविले. त्यांणीं तुह्मांस घेऊन आले, ते परस्परें बावड्यास गेला ते समयीं धण्यासन्निध येता तरी तुह्मांस हें श्लाघ्यच होतें; परंतु हा विचार न पाहतां बावड्यास राहिला. तेथेंही मागती तुह्मांकडील कोणी भला माणूस आणवून बोलीचाली करावी याकरितां तुह्मीं राम ठाकूर व भगवंतराव पिंगळे ऐसें उभयतांस येथें बोलाचालींस पाठविले. बोलीचाली लागली असतां तुह्मीं परभारें सालवणावरी स्वारी करून दगा केला. बोलीस भला माणूस पाठवून ऐसे दंगे करिता, कोठे ऐकिलें आहे कीं काय ? किंबहुना हेही तुह्मापासून घडलें , तेव्हा धणियांनी क्षमा कोठपर्यंत करीत यावें ? ये गोष्टीचा विचार स्वहिताहित ज्याचा त्याणे चित्तात आणावा तरीच बरे सांगितले. गोष्टीचा परिणाम लागणे नाहीं प्रस्तुत तुह्मीं पत्रें दिवाणात लिहिलीं, त्यात निर्भत्सना करून लिहिलें यांत तुह्मां लोकांस भूषण कोणते ? पदें कागदीपत्रीं लिहावी, हे सामान्याची कमई । तुह्मांस योग्य नव्हे. जीं पत्रें येतात त्यांत किमपि तुमचे निष्ठार्थ नाहीं. जे लिहिणें तें विडंबर लिहितां. यावरून तुह्मांविशीं धण्यास अर्ज करणारानें कसा काय करावा ? धण्यास तरी कृपा कशी उपजेल ? ' या राज्यांत विवेक, विचार, शहाणे लोक, सभ्य, चतुर, विद्यावंत नाहींत, राजश्री शाहूराजे यांचे राज्यात सरकारकुन लक्षाचे लक्ष जिल्हे मामले खाऊन सुखरुप आहेत', ह्मणून लिहिलें.तरी तिकडील सरकारकुनानें अथवा सरदारानें धण्यासी अमर्यादा केलीसी नाहीं धण्यासी निष्ठेनें वर्तोन, आपलें नंगानें राहोन, कीर्ति संपादून घेतल्या. यद्यपि कोणी अमर्यादी वर्तणूकेस प्रवर्तले तरी तत्क्षणीं त्यास शिक्षा होईल, या भयेंकरून जे जे आहेत ते बहुत मर्यादेनें असतात.