Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

[ १०४ ]                                          श्री. तालीक.                                      ८ डिसेंबर १७२८.

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ किलक सवत्सर मार्गशीर्ष बहुल तृतीया रविवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी यांणी चौधरी व देशकुलकर्णी व शेटे माहाजन व पाटील व खोत र्ता। सोनवळें प्रा। भिवडी यांसी आज्ञा केली ऐसी जे- राजश्री भगवंतराऊ रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र यांनी सातारियाचे मुक्कामीं हुजूर येऊन स्वामीसंनिध विनति केली कीं, र्ता। मारीचे अदकारपणाचें वतन कदीम आपलें आहे, व या वतनास हक्क व लाजिमा व इसापती गांव पेशजी चालत आले आहेत, त्याप्रो । चालावयासी आज्ञा केली पाहिजे ह्मणून. त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें आहे. तरी तुह्मीं र्ता। मारीचे अदकारपणाचें वतन यांचें यास चालवणें व हक्कलाजिमा व इसापतीचे गांव इनाम शेतें बांधाणें सुदामत चालत आलें आहे त्याप्रमाणें यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें चालवणें. या पत्राची प्रती लेहोन घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतोन देणें. जाणिजे.