Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १९५ ] श्री. २१ मे १८१७.
राजश्री कमाविसदार मा। हाय व समस्त सरनाईक सरदार गोसावी यासीः -
पो। अमृतराव रघुनाथ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असावे. विशेष आपण पत्र पाठविलें तें पावलें. पूर्व रुणानुबंधाचे अर्थ व श्रीमंत महाराज यांचे लक्षाचे भाव लिहिले ते व राजश्री बच्याजी अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो । बाजीराव रघुनाथ प्रधान आशीर्वाद व नमस्कार. सुरुसन सबा अशर मैयातैन व अलफ. त्रिंबकजी डेंगळा कुपणी इंग्रजबहादर याचे कैदेतून पळून बड करीत आहे त्याची चौकशी गांवगन्ना करून डेगळा मजकूर याचा ठिकाण लावून जिवंत अगर मेलेला सरकारांत हावाला करून देईल त्याजला बक्षीस दोन लक्ष रुपये व हजार रुपयाचे गांव इनाम इंग्रजबहादर याचे विद्यमाने दिल्हा जाईल याप्रमाणें खातरजमा राखोन सरकार चाकरी करून दाखवावी याची पुरती चौकशी करून जो त्रिंबकजीस धरून आणोन देईल त्याजवरी सरकारची सरफराजी होईल. येविशीं जो कोणी अनमान करील त्याजवर सरकारची इतराजी होईल. व समस्त गरीब रयत ब्राह्मण व ह्माराठे व परदेशी व मुसलमान व वाणी उदमी व बेरड, भिल्ल, माग, रामोशी व रहेदार वगैरे जे कोणी त्रिंबकजी डेगळा याचा पत्ता अमुक जाग्यावरी आहे असा प्रत्यक्ष सरकारात दाखवून देतील त्यास पाच हजार रुपये बक्षीस व एक चावर जमीन इनाम इग्रजबहादूर याचे विद्यमानें पावेल डेगळा मजकूर याचा पत्ता ठावोक असोन जर कोणी सरकारांत समजावयास आळस केला असें विदित जाहलें तरी त्याचें पारपत्य होईल त्रिंबकजी डेंगळा बंडवाला याच्या मिलाफांतील इसम १२.
१ बापू गाईकवाड सेट फलकर.
१ भागोजी.
१ रविराव शिंदे लोणीकर.
१ तिमापा वडारी
१ माहादाजीपत नातेपोतेकर
१ गोधोजी डेंगळा.
१ सयाजी मुळे.
१ अप्पाजी पा। कुंरुबवीकर.
१ निंबाजी यादव फलटणकर.
१ महीपंत डेंगळा.
१ बापू बारडकर.
१ दाजी डपळे.
------------
१२
येणेंप्रमाणें येकूण बाराजण याचे कुटुंबाचीं मुलेंमाणसें कैद करून बेड्या घालोन बंदोबस्तीनें हुजूर पोचते करणें व त्यांचीं घरें जमीनदोस्त करून घरांतील चीजवस्तू सुतळीचे तोड्यासुद्धां जप्त करून त्याचा आकार होईल तो ज्याजती शिबंदी वगैरे खर्च लागेल. त्याऐवजीं घेणें व त्यांची इनामवतनवृत्ती असतील त्या जप्त करणे या बाराजणांपैकीं जे कोणी त्रिंबकजी डेंगळा यांसी धरून आणोन देतील त्याचा अपराध माफ होईल वर लिहिलेप्रमाणें बक्षीस पावेल. या बाराजणाखेरीजकरून बंडाचे मिलाफी स्वार व पायदळ व कारकून व शागिर्दपेशा वगैरे बडाची चाकरी सोडून आपलाले घरीं येऊन जमेदार व मोकदम यासी रुजू होऊन राहिले असतां त्यास बंडाचे मिलाफाचा अपराध माफ केला जाईल बडाची चाकरी सोडून न आलेस वर बाराजणाचे पारपत्य करावयाचें लिहिलें आहे त्याप्रमाणें याचे पारपत्य करणें बंडाचे मिलाफी गरीब लोक यांतून कोणी त्रिंबकजी डेगळा याचा पत्ता लावून प्रत्यक्ष सरकारांत दाखवून देईल त्यासही वर लिहिल्याप्रमाणें बक्षीस पावलें जाईल जाणिजे. छ ४ रजब सिक्का आज्ञाप्रमाणें मोर्तब.