Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९७ ] श्री. २९ एप्रिल १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलक नाम संवत्सरे वैशाख शु।। द्वितीया इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपती स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकमत पन्हा यांसींः-
आज्ञा केली ऐसी जे- तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. व शेख महंमद या बरोबर कितेक सांगोन पाठविलें तें यांणीं सविस्तर सांगितलें. त्यावरून विदित जालें. त्याप्रमाणें सौभाग्यवती गोदूबाई व राजश्री धोंडो भास्कर, व नारो हणमंतराव, बाळाजी महादेव, याजवळ स्वामीनीं आज्ञा करून याचा निशा केला आहे, त्याप्रमाणे हे तुह्मांस लिहितील. व सौभाग्यवती गोदूबाई आली आहे तेंही सांगतील. त्यावरून कळेल. तरी तुह्मीं कोण्हेविषयीं दुसरा विचार चित्तात न आणितां स्वामी संनिध येणें. अत. पर तुमच्या चित्तांत कांहीं संशय असेल , तर ज्यास तुह्मीं पाठवा ह्मणाल ते लेहून पाठविणें. स्वामी त्यास पाठवून देतील. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेंय विराजते.