Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०३ ] श्री. १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलक नाम संवत्सरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी यांणीं राजश्री भगवंतराऊ रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र अधिकारी तो । सोनवळें प्रांत भिवडी यांसी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं हुजूर सातारियाचे मुकामीं येऊन विनंती केली कीं, ता। सोनवळें प्रात मजकूर येथील अदकारपणाचें वतन कदीम आहे परंतु मुरार भानजी गोत्रज यांच्या वडिलीं आमच्या वडलाचा मारा मौजे भादाणे तो। मजकूर येथें केला. आणि जबरदस्तीनें वतन खात होता. तेव्हां आपले तीर्थरुप राजश्री रामचद्र निलकठ यांणीं पत्रें लेहोन गोविंद रंगनाथ मुतालीक कल्याणास अजम जेनुद अल्लीखान व काकाजी नाईक दिवाण यांजकडे पाठविला त्याणें तेथें जाऊन पत्रें देऊन हकीकत श्रुत केली त्यावरून हकिमांनी कल्याण भिवंडीचे जमीदार आणवून गोतमुखें उभयताचा निवाडा करविला. जुन्या हकीकती गोतानें मनांस आणून गोतमुखें मुरार भानजी खोटा जाला. र्ता। मजकूरच्या वतनास लाभत नाहीं, ऐसें खरें जालें. तेव्हां हें वर्तमान लेहोन तेथून अवरंगाबादेस गेले. तेथें दाउदखान वंची, किलिजखान, व द्यानदखान दिवाण यांणीं मनास आणून परवाने करून दिधले. ते परवाने दिल्लीस पाठविलें. तेथें बाहादूरशाहा पातशाहीस जुलपुकारीखा दिवाण यांणीं श्रुत करून पातशाही फरमान करून दिधला. तो व परवाने मनास आणून आपलें वतन आपले दुमाले करून चालवावयाची आज्ञा केली पाहिजे, ह्मणोन विदित केलें. त्याप्रमाणें मनास आणून तुह्मांवरी स्वामी कृपाळू होऊन र्ता। मजकूरचे अदकारपणाचें वतन तुमचे दुमाले करून हें वतनपात्र दिलें असे. तरी तुह्मीं या वतनाची सेवा करून पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें वतन अनभवून सुखरूप राहणें. या वतनास हक लाजिमा व इना इसाफत गाव सुदागत चालत आले आहेत वगैरे वितपसील.
इनामतीचे गाव कदीम दस्ताप्रा। र्तामजकूरचे देखील कसबे देहे
१ मौजे भादाणे ८४ येथील हक्क लाजिमा सुदामत
१ मौजे कुळासे प्रमाणें कलम १ बंदर व रहदारी
------- दर गोणीस हक पक्के पैसे
२ र्ता। मजकूरीं पेठ व बाजार आहेत,
इनाम गावगन्नाचे व बाधाणें कदीम चालत तेथे शेव व धार व दसकी
आलें आहे त्याप्रमाणें चालवणें कलम १ व सुदामत प्रमाणें कलम १
इसाफती वतनी वाडे व झाडझाडोरा व राबते
महार सुदामत प्रमाणें १
येणें प्रमाणें हक्क लाजिमा करार केला असे. तो घेऊन वतनाची सेवा करुन सुखरुप राहणें. जाणिजे.