Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.

शके १७२२ रौद्रनाम संवत्सरे सुरू सन, ईहिदे, मया, तैन व अलफ, सन १२१० संवत अठराशें सत्तावन, १८५७ शक १२७ इसवी सन १८०० व १८०१

१ अमृतरावसाहेब देवावे करावयास वर्ष प्रातपिदेपासून लागले, बाजीरावसाहेब त्यांजवर देणें करून कारभार कचेरी होऊ लागला, नारोपंत चक्रदेव फडणीसीची तारिख करीत होते चैत्र शु॥ १.
२ अमृतरावसाहेब याणीं वडगांवास बारव विहिर केली तिचें उद्यापन वैशाख शु।। ६ छ. ४ जील्हेजी केलें.
३ नारोपंत चक्रदेव व वजाबा शिरवळकर चिमणाजी खंडैराव असे नानास दत्तक पुत्र घ्यावा असें श्रीमंतांजवळ व शिंदे यांजवळ बोलानें ठरावांत आणिलें, श्रीमंतांचें मनांत नव्हतें, परंतु चक्रदेव वगैरे यांस कैद करावयाकरतां नाद चालविला. श्रीमंतांनीं शिंदे यांस संकेत करून त्यांस वाड्यांत बोलाविलें ते जेष्ठ व॥ ७ सह अष्टमी शुक्रवारीं छ, २० मोहरम शिंदे फौजसुद्धां वावाड्यांत आलै. शामीरखान वगैरे फौज चक्रदेव याणीं वाड्यांत बोलाविली. शिंदे आल्यावर दत्तकाचे ठरवावयाकरतां नारोपंत चक्रदेव, बजाबा शिरवळकर, धोंडोपंत लिमये, राघोपंत गोडबोले, लक्ष्मणपंत चक्रदेव, चिमणाजी खंडेराव असे आंत बोलाऊन कैद केलें. नंतर शामीरखान यास लोकसुद्धां प्रहर रात्रीस वाड्यांतून बाहेर काढून दिलें. शिंदे याचे लोक वाड्यांत होते.
४ नाना फडणवीस यांचे वाड्यांत अरब होते ते न निघत, याकरतां तोफा त्यांचे वाड्यास जेष्ठ व। ८ शनवारीं लाविल्या. पश्चिमेकडील एक कोपरा जाया झाला व वाड्यांत गोळे जाऊन पडले. दुसरे दिवशीं जेष्ठ व॥ ९ छ. २२ मोहरम रविवारीं आरब बाहेर गेले. शामीरखान पठाण भवानी पेठेंत होते. त्याजवर तोफा शिंद्याकडून येऊन त्याचे वाड्यावर गोळे मारून त्यांस लष्करांत नेलें. तेथून काढून दिलें जेष्ट व। १० सोमवार छ. २३ मोहरम.
५ अमृतरावसाहेब व बाबासाहेब व अप्पासाहेब नानाफडणीस याचे बायकांचे समाधान त्याचे घरीं गेले. जेष्ट व ॥ १४ छ. २७ मोहरम