Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
मोरो बाबुराव फडणीस जुन्नरास येऊन राहिले होते ते आषाढ शु॥ १। छ, २९ मोहरम सोमवारीं पुण्यास आले. गारपिरावर श्रीमंत त्रिवर्ग व दौलतराव शिंदे वगैरे एक जागा बसून मोरो बाबूराव येऊन भेटी झाल्या. शिंदे आपले गांवास गेले. मोरो बाबूराव बाबासाहेबांचे मागें अंबारींत चवरी घेऊन बसले. अमृतरावसाहेब व चिमणाजीअप्पा एके अंबारींत होते. त्यांचे मागें मोरो बाबुराव यांचे पुत्र बसेल, अंबारीचे पुढें व बाबासाहेबांचे मागें आबा पुरंधरे याची अंबार, याप्रमाणें स्वारी रवीवाराहून बुधवार पेठेनें वाडा उजवा घालोन वाड्यांत दाखल झाले.
६ गोविंदराव कृष्ण काळे कैदेंत होते त्यांस चिट्टी बाजीरावसाहेब याणीं पाठविली कीं, नारोपंत चक्रदेव वगैरे मंडळी यांची चाल आह्मांस दाखवून दवलत. करावी. नाना फडणीस यास नगराहून आणावयाचें करून त्यांची जरब आह्मांवर ठेवून कामकाज चालवूं लागले ती तुमची आमची बोलणीं समक्ष होतच होती. सांप्रत या चालिची पराकाष्टा दिसण्यांत आली. ती काय लिहावी ? समक्ष बोलण्यांत येईल. जेष्ठ व॥ ७ मास मशारीनल्हे आदिकरून चिमणाजी खंडेराव व बज्याबा शिरवळकर वगैरे मंडळी नजरबंद केली. नंतर दवलतींत दिसावयाजोगा माणूस हुजूर नाहीं. तुह्मी पेचांत, शिंदे याचीं बोलणीं तुह्मांविषयीं तेव्हांची त्यांत कसेंही करून तुमची मुक्तता होय. या प्रयत्नांत मी आहेच; दवलतींत माणूस दिसावयाकरितां जुन्नराहून मोरोबादादा फडणीस यास आज आणून गारपिरावर भेट होऊन खवासीत घेऊन पुण्यास आले. तुह्मांस कळावें ह्मणून चिठ्ठी पाठविली त्याचा मसुदा राबिसनसाहेब बहादूर यांचे कागदांत सांपडला त्यावरून.