Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

सदरहु अन्वयें जप्त्या उठवून देऊ येणेप्रमाणें करार

८ स्वामीचें वांकडें पहाणार व लक्षांत नाहींत त्याचें पारपत्य स्वामीनी करून निष्कट करावें. आह्मी सर्व प्रकारें अनुकूल ऐशी तुमची विनंती त्यानें आणि दवलतीचे व जातमुबारकेचे वांकडे पहात असतील व लक्षांत नाहींत व उद्योगीही नाहींत अशांचें पारपत्य व बंदोबस्त सरकारांतून होईल, त्यांस तुमची अनुलता असावी. आज्ञा होईल तसें करीत जावें, ह्मणजे निष्कट होईल.

सरकारचे वांकडे पहात असतील व लक्षांत नाहींत त्याचे परिपत्य सरकारांतून व्हावें, त्यास सेवकाकडून आज्ञेप्रमाणें अनुकुळतेंत कमी पडणार नाहीं येणेंप्रमाणें करार.

९ सरकार तालुक्यांत तुह्मांकडील पागे पतगे मनस्वी उपद्रव देऊन खंडण्या वगैरे ऐवज घेतात. तो मना करून, याउपरी सरकार प्रांतांत पागे पतगे वगैरेस निक्षून ताकीद पाठवून बोलवून घ्यावें ह्मणजे सरकारचे लागदार लावणीच्या बंदोबस्ती करतील. तुह्मी निधून ताकीद केली असतां उपद्रव करू लागल्यास त्याचें पारपत्य करावें. पागे पतके व कंपुवाले यांचा उपद्रव लागतो त्याचा बंदोबस्त आज्ञेवरून होईल. कोणी लबाडी केल्यास पारपत्य करावयास येईल. येणेंप्रमाणे करार.

१० सरकारचे मातबर व महान सरदार वगैरे व पर दवलतदार यांजकडून सरकारचा ऐवज वगैरे जबासाल उलगडून घ्यावयाचें तें कराराप्रमाणें त्यांजपासून सरकारांतून उलगडून घेतले जातील, कोंणी दिकत केल्यास जरब देऊन कामें उगवली पाहिजे. त्यांस तुह्मीं अनुकूळ असावें.
वाजबी ऐवज सरकारचा येणें वगैरे जाबसाल असतां कोणी दिकतकरील त्यांजवर जरब देऊन उलगडून घ्यावे येविषयी शेवकाकडून अनुकूळता होईल येणेप्रमाणे करार,