Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ श्रीमत महाराज छत्रपति.
२ करवीरकर महाराज ३ सेनासाहेब व सुभा. ४ गोविंदराव गाईकवाड ५ टिपू. ६ मालीट इंग्रज मुंबईकर. ७ फिरंगी गोंवेकर,८ जंजीरेकर हापशी.
-----
८
सदरहुप्रमाणें यादीची नकल महिपतराव चिटणीस याजवळ आहे, त्याजवरून लिहिलें असे. नाना कांहीं दिवस शिंद्याचे लष्करांत होते. तेथून नगरचे किल्ल्यांत पाठविले.
१ नाना, शिंदे यांचे लष्करांत गेल्यावर श्रीमंतानीं बाबा फडके, आप्पा बळवंत नारोपंत चक्रदेव, गोविंदराव पिंगळे व नारो निळकंठ मुजुमदार, त्रिंबकराव परचुरे, नारायणराव वैद्य चिटणीस. वगैरे सारे मंडळीस वाड्यांत बोलावून कैद केलें.
२ कारभार, रावसाहेब यास घेऊन बाजीरावसाहेब जातीनें आपणच करूं लागले. तारिख आपणच घालों लागले. फौजेचें काम बाळाजीपंत पटवर्धन यांजकडे सांगितलें. अमृतरावसाहेब यांचे लक्षानें कारभारांत गोविंदराव काळे व शिवराम नारायण थत्ते वागों लागले.
३ परशराम रामचंद्र यांचे सरंजामाची जप्ती मोरो बापुजी यांजकडे सांगितली छ १७ रजब.
४ कोंकणचा सरसुभा विनायकराव अमृतेश्वर याचे नांवे करून वस्त्रें दिली छ १० साबान, सरसुभ्याचें काम अमृतरावसाहेब याणीं गणपतराव जीवाजी जोग यांजकडे सांगितलें.
५ करवीर महाराज फौजसुद्धां तासगांवास उपद्रव करून कर्नाटकांत जाऊन पेशवे यांचे मुलखांत ठाणें घेतली लुटले. व वल्लभगड किल्ला घेतला. बेळगांवास उपद्रव केला. त्यांजविशी मुरारजी पवार याजबराबर बाजीरावसाहेब याणीं पत्रें करवीर महाराज व रघुनाधराव माने यास पाठविली; त्यांत मजकूर ठाणीं सोडून घ्यावीं व ऐवज घेतला असेल ते माघारा प्यावा व मुलखास उपद्रव करूं नये ह्मणोन छ. १२ साबान सनसमानिची पत्रें गेलीं त्याचीं उत्तरें महाराजांची व माने यांची आली. त्यांत वल्लभगड हवाली करून घ्यावयास कोणी पाठवावा. ह्मणजे त्याचे हवाली करून मुलखास उपद्रव होणार नाहीं ह्मणोन आली. त्याच्या नकला महिपतराव चिटणीस यांजवळ आहेत व करवीकर यांची फौज टिपुसुलतान याचे मुलखांत जाऊन मेल बिदनुर तालुका लुटुन व वरकड तालुक्यांत उपद्रव केला येविषयीं त्यास ताकीद होऊन लूट केली आहे ती ठाणे देऊन पुढें उपद्रव न करीत असें व्हावें ह्मणोन टिपुसुलतान याचें पत्र आलें. त्याचा जाब कोल्हापूरकरांचे सरदारास निक्षून ताकीद रवाना केली. असे ह्मणोन छ, २७ सफर सन तिसांत गेला आहे त्याची नकल महिपतराव चिटणीस यांजवळ आहे त्यांजवरून नानाफडणवीस कैद झाल्यावर छ १२ साबनचे पत्र गाईकवाड यांस गेले. त्यांत दुसरा अमलदार अमदाबादेस रवाना होत आहे. तोंपावेंतों आबाजी कृष्ण यांजकडील कारकून, यांस वसूल घेऊन द्यावा ह्मणोन सदरहूची नकल चिटणीस यांजवळ आहे. त्यांजवरून.