Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
६ चिमणाजीअप्पाचें पहिलें लग्न छ. १८ जिलकाद वैशाख वद्य ५ मंगळवारीं झालें. मोरोपंत दामले यांची कन्या नांव सिताबाई ठेविलें.
७ रघोजी भोसले सेनासाहेबसुभा आषाढ वद्य ४ गुरुवारीं १८ मोहरमीं नागपूरास जावयाकरतां निरोप दिला. सबब गढेमडळ चोरोगडसुद्धा त्यास घ्यावयाचे नानानीं ठरविलें. त्याच्या सनदा पेस्तर स. २७ जिल्हे दिल्या असेत.
८ श्रीधर लक्ष्मण मुनशी व कृष्णराव माधव व रामचंद्रदादा निसबत रघोजी भोसले यास परगाणे जळगांव प्रांत व-हाडेपैकीं देहे ८ इनाम दिले स. १७ सफर.
९ बाळाजीपंत पटवर्धन व भिवजी काळे यांस पागा दिल्या.
१० पर्वतीची दक्षणा चार खासे बसून वाटावयास प्रारंभ केला.
११ मशिरीन मुलुख यास हैदराबादेस जावयास निरोप श्रीमंताचा घेतल्याशिवाय गेले. खरड्याचे स्वारीस नबाबाचे सरकारचा मुलुख घेतला होता तो नानानी बाजीरावसाहेब यांजकडून माघारा देविला. रुसकतीवांचून देऊं लागले. त्याचे मनांत वाकडेपणा नसावा. दोस्ती साफ चालावी, ह्मणोन सदाशिव माणकेश्वर यास पत्र श्रीमंताचे गेलें त्यांत लिहिलें आहे. मशिरीन मुलुख हैदराबादेस गेल्यावर नुरुदी हुसनखान ऊर्फ बोडखान याचे बंधु नबाब निजामजंग याखे निसबतीस वीस हजार फौज व परांडानल दुर्ग किल्ले त्याचे हवालीं झाले. सलाबतखान व सुभानखान वगैरे फौज निजाम जंग याचे तेनातेस आली. निमामजंग याजवळ नानानीं आपले तर्फे जनार्दन शिवाजी मस्कर व त्रिंबकराव साठे यांस ठेविलें. फौजेची छावणी पंढरपुराचे आसपास सरहोदवर भीमा पार होतीं. पुढें नाना फडणवीस मृत्यु पावल्यावर मस्कर यांस निजामजंग याणीं कैद केंलें. पुढें निजामजंग यास हैदराबादेस बोलावून घेऊन किल्याची घालमेल केली, व फौज त्याची दूर झाली. महाडास नाना असतां गोविंदराव भागवत याचे विद्यमानें चवदा कलमांची याद नबाब यास मखलाशीची करार करून दिली.