Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

१४ कुलाब्याचे संस्थान रघोजी अंग्रे याचे तिर्थरुप येसाजी अंग्रे रेवदड्यांस राहात होते. त्याचा दावा संस्थानावर नसतां बाबूराव आंग्रे, दवलतराव शिंदे याचे मामा त्या आग त्यानें श्रीमंताची परवानगी घेऊन, येशवंतरावाकडे हरीपंत भावे याजवर बराबर पलटण देऊन कुलाब्याचा किल्ला शिंदे याणी घेऊन बाबुराव आंग्रे यास दिला. राघोजी आंग्रे याचे हवाली केलें. त्याणी कैदेंत ठेविलें. नंतर दस-याचे दिवशीं श्रीमंतानीं संस्थानची वस्त्रें बाबुराव आंग्रे यांस देऊन वसई सरखले किताब दिल्हा.

१५ परगणे होनगुंद माहाल तोफखाना याकडे सरंजामास होता. तें ठाणें घ्यावयाकरितां रायचुराहून मुदगलकर याणीं तोफा व फौज आणविली. सबब धोंडोपंत गोखले फौज बाळगून कर्नाटकांत होते, त्यास होनगुंदचे कमाविसदारानीं कुमकेस बोलाविलें. त्यावरून गोखले याणी फौजसुद्धां जाऊन मुगदलकरासी लढाई दिली. तोफा पाडाव करून आणिल्या. त्यावरून गोखले यास सर्फ राजीचें पत्र रजबचें पत्र गेलें. त्याची नकल चिटणीसाजवळ आहे त्यावरून बाजीरावसाहेब यांची मिजाज कायम नाहीं. पहिल्यानें शिंदे याशी राजकारण केलें नंतर पुण्यांत नानाची भेट होतांच त्यास मिळोन शिंद्याशीं बिघडलें. पुढें नाना कारभार करीत असतां त्याजविषयीं अनेक प्रकारें वाकडेपणा मनांत आणू लागले. त्यास अनुमोदन अमृतरावसाहेबाचे पडत गेले. व सर्जेराव घाटगे साह्य मसलतीस झाले. तेव्हां नानास शिंदे याणी कैद करावें असें केलें. त्या राजकारणांत नानाचे भरंवशाचे यशवंतराव घोरपडे मिळाले. त्यानीं शिंद्याविषयीं नानाची खातरजमा केली. शिंदे नानाचे घरीं आले. मेजवान्या देऊन . सफाई दाखविली. तत्राप नानास भरंवसा न येई. तेव्हां मुकरेसाहेब . याजकडून शिंदे याणीं इनाम देऊन लष्करांत मेजवानीस यावें असें ठरविलें. पौष वद्य १३ राविवारीं छ, १२ रजबा शिंदे यांचे लष्करांत वानवडीवर . मेजमेजवानीकरतां गेले. तोंपावेतों नानास धरावयाचे शिंदे याणी मुलारेसाहेब यास कळों दिलें नव्हतें. नाना लष्करांत दाखल जाहल्यावर कळविलें. त्यावरून त्याचें बोलणें पडलें कीं, ही गोष्ट होणार नाहीं. तेव्हां दवलता शिंदे याणीं मरासद अल्ली वैद्य याजपासून त्याशीं बोलोन रुकार घेतला. मुलारेसाहेब लाचार होऊन रुकार दिला. नंतर नानास व त्यांबरोबरचे मंडळीस कैद केलें. शिबंदिचे लोक काढून दिले व कांहीं पळून आले. नानाचे वाडे व सरंजाम वगैरे श्रीमंतानीं जप्त केले. सरंजामाच्या जप्तीच्या सनदा मुजुमदार यांचे घरीं बार आहेत; व बाळाजी जनार्दन याचे निष्टत अंतर दिसले. सरकार लक्षाची वर्तणूक नाहीं. याजकरितां दौलतराव शिंदे आलीजा बहादर यास आज्ञा करून मशारनिल्हे नजरबंद केलें. तुह्मास कळावें, आपले स्नेहाचे सिलसिले सरकाराशी पूर्वीपासोन आहे त्याप्रमाणें असावें ह्मणोन पत्र छ, १२ रजवान बाजीरावसाहेबांनीं पाठविली. ती तपशील.