Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
सदरहु अन्वयें सरकारांतून आज्ञा होईल त्याशी जुजबी जाबसाल असतील ते बोलण्यांत येतील. येणेंप्रमाणें करार.
३ तुमचे खानगीचे खर्चविषयीं तुह्मी सरकारांत विनंती केली याजवरून सरकारचे व तुमचे विचारे सदतीस लक्ष रुपये तुह्मांस द्यावयाचें ठरलें. त्यास यामागें सरकारांतून व सरकारचे कारकून वगैरे यांजपासून ऐवज घ्यवायाचा करार होऊन तुह्मी दस्तऐवज घेतले त्यापैकीं वसूल पाउन, बाकी राहिली ती याउपरी तुह्मी मागूं नये. दस्तऐवज चिट्टया वगैरे असतील ते सरकारांत माघारे घ्यावें.
४ रवानगीचे खर्चास सदतीस लक्ष रुपये ठरले त्याप्रमाणें पंचवीस लक्ष रूपये तूर्त घ्यावें. त्याची निशा सावकार खुशालचंद यांजकडून देववावी आलाहिदा यादी मुदतीची ठरेल त्याप्रमाणें एक महिन्याचे आंत निशा घ्यावी. व बारा लक्षांच्या वराता बाळाजी गोविंद बुंदेले व शिवराम हरी झांशीचे मामलेदार यांजवर करून घ्यावा. यामागें सरकारचे कारकुनाचे दस्तऐवज असतील ते शोध करून निघतील ते माघारे दुसरे विल्हेस पडले असल्यास त्याजबद्दल जाबसाल राहिला नाहीं; येणेंप्रमाणें करार.
५ तुह्मांकडील दोन पलटणें व एक हजार फौज हुजुर चाकरीस राहील, त्याणीं सरकारचे आज्ञेप्रमाणें चाकरी करावी. हुकमांत वागावें. त्याचे मदत खर्चास पांच लक्ष रुपयांचा वसुली सरंजामकडील दिला आहे.
पांच लक्षाचा सरंजाम पलटणें व फौज राहील त्यास वसूल जमेच्याकडील घ्यावा. सरकारआज्ञेप्रमाणें चाकरी करून हुकमांत वागतील येणेंप्रमाणें करार.
६ सरकारांतून तुह्मांस जाण्याविषयीं आज्ञा होईल तेव्हां कांहीं अडचण न घालतां कुच करून जावें. आज्ञा झाल्याविरहीत कुच करून जाऊं नये. मसलदीनुरूप जाणें राहाणें स्वामीचे शेवकाचे विचारें ठरेल त्याप्रमाणें करप्यांत येईल. सरकार आज्ञेप्रमाणें निरोप घेऊं. न जाणें झाल्यास कांहीं अडचण घालणार नाहीं येणेंप्रमाणें करार.
७ प्रांतांतील सरकारचे व सरंजामी यांजकडील गांव खेडीं वगैरे येथें तुह्मांकडून व तुह्माकडील तालुकेदार यांजडून जप्त्या झाल्या असल्यास उठवाव्या. व याउपरी होऊं नयेत.