Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

त्याजवर नानाचा करार करून दिली. त्याजवर नानाचा करार नव्हता. याजकरता रघोत्तमराम यास नानाची चिट्ठी लिहिली. त्यांत लिहिलें आहे आहे कीं जे समयीं तुह्मीं याद आणाल तेव्हां करार करून देऊं; ती याद सही व मान्य असें. यादीवर आमचे हातचा करार नाहीं ह्मणोन दवला बहादर संशय घेतील, यास्तव हें करारचें पत्र लिहिल्याप्रमाणें आमलांत येईल ह्मणोन छ. १७ राविलाखरचें पत्र त्याची नक्कल राबीसन साहेब यांजवळचे कागदांत आहे. चवदा कलमाचा तपशील लागला नाहीं. व नाना पुण्यास आल्यावर मशिरीन मुलुख याजपासून पाच कलमाची याद करून घेतली आहे त्याचाही तपशील सांपडला नाहीं.

१२ तुकोजी होळकर याचा काळ श्रावण वद्य ८ मंगळवारीं झाला. क्रिया काशीराव होळकर याणी केली. छ. २१ सफर पुढें काशीराव व मल्हारराव यांचे बनेना, मल्हारराव आपली फौज थोडीशी घेऊन दाभाडे यांजवळ राहिले त्याजकडे आंतून नानाचें लक्ष. याजकरतां काशीराव होळकर याणीं दौलतराव शिंदे यांस ऐवज रोख व मुत्सद्दी यास दरबार खर्च व इनाम गांव द्यावयाचे कबूल करून मल्हारराव यास धरावयाचे ठरविलें. त्यांजवरून शिंदे याणी धरावयास फौज पाठविलीं, परंतु मल्हारराव याणी शिपायगिरी केली. जमेत थोडी यांजमुळें मारले गेले भाद्रपद व।। ९ छ, २२ रबि । लावक. त्याजवळ लाख रुपये बोली करून एक शिपाई चाकरीस होता तो ठार पडला. आणखी लोक मारले गेले. लोणीकर होते ते ठार पडले. त्याची बायको शितोळे याची लेक लोणीस हेती, तिला वर्तमान समजतांच तिणें प्राण सोडला. यशवंतराव होळकर पळोन गेले. मल्हारराव याची बायको जिजिबाई गरोदर होती. त्यास घेऊन मल्हार शामजी कारभारी पुण्यांत येऊन कुमठे यांचे वाड्यांत राहिले. जिजाबाई प्रसूत होऊन पुत्र झाला. त्याचे नांव खंडेराव होळकर ठेविलें.

१३ गणपतीचा उत्साह वाड्यांत झाला. गणपति पोंचवावयास श्रीमंत पायउतारा गेले यामागें अंबारीत बसून जात होते.