Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ नारोपंत चक्रदेव कैद केले ते व बजाबा शिरवळकर व राघोपंत गोडबोले व धोंडोपंत लिमये व लक्ष्मणपंत चक्रदेव एकूण पांच असामी बाळाजीपंत पटवर्धन खासा पागेसुद्धां व भिवजी नाईक अशी बराबर देऊन जुन्नरास आषाढ शु।। १२ शीस नेले. हाडपसरास पोंहचविलें. चिमणाजी खेंडराव प्रतागडास पाठविले.
२ दौलतराव शिंदे यांची खानगी हिंदुस्थानात करावयाचे ठरविलें. त्याजवरून श्रीमंतांचे दौलतीचे बंदोबस्ताचीं कलमें शिंदें यांजकडून करार करून घेतला. त्याची याद व शिंदे यांस सरकारांतून ऐवज घ्यावयाचा ठरला त्याची याद राबीसनसाहेब बहादुर याजवळचे कागदांत आहे त्यावरून.
१ श्रीमंतांनीं दोंलतीचे बंदोबस्त विषई कलमें लिहून याद शिंदे यांजकडे वानवडीस पाठविली त्या कलमावर शिंदे याणीं करार करून याद सरकारांत पाठविली. यादीची तारिख छ, २ सफर आषाढ़ मास सन मजकूरकलमें---
१ सरकारचे व जातमुबारकेचे लक्ष सोडून जे असतील त्यांचा बंदोबस्त मनोदयारूप केला जाईल. त्यास तुह्मी अनुकूल असावे. सदरहु अन्वयें आह्मांकडून अनुकूळतेंत कमी होणार नाहीं. येणेप्रमाणे करार.
२ पुण्यांतील व प्रांतांतील दादी फिर्यादी तुह्मांकडे येऊन ताहाकयांत पत्रें व हुजुर चिटया घेतात त्यास या उपरी कोणी दादी फिर्यादी आल्यास हुजूर पाठवावें. परभारें तुह्मांकडून पत्रें व मसाले वगैरे होऊं नये व हुजुर चिट्ट्याही होऊं नयेत. सदरहु अन्वयें वर्तणुक होईल. हा करार हरएक जाती कामाकरतां तुमची चिठ्ठी हुजुर येऊं नये. सरकारांतून विश्वासुक बोलणार त्यांशीं तुह्मी बोलावें. मशारनिल्हे जी हुजुर विनंती करून जाबसाल वाजवी असतीलसे उलगडून घेऊन तुह्मांस सांगावें.