Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

५८. झाली हकीकत, समजली तशी, आपल्या ज्ञानाच्या आंवाक्याप्रमाणें, लिहून ठेविणारे बखरकार शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशांत झाले, ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. परंतु ह्या सर्व बखरकारांच्या ज्ञानाची व्याप्ति अत्यंत संकुचित होती, हीहि गोष्ट सांगितल्याशिवाय गत्यंतर नाहीं. झाली हकीकत, जशीची तशी, सर्वांगांनीं संपूर्ण, अशी देणें मोठें बिकट कृत्य आहे. एखाद्या वैदूला राष्ट्रसभेची जी हकीकत देतां येईल, त्यापेक्षां विस्तृत हकीकत एखादा दशग्रंथी ब्राह्मण देईल; आणि दशग्रंथी ब्राह्मणापेक्षां विस्तृत व कदाचित् कार्यकारणभावसंबंधक हकीकत एखाद्या आधुनिक विद्याधराला देतां येईल. परंतु, यूरोपांतील राज्ययंत्राचा ज्यानें आजन्म अभ्यास केला आहे आणि यूरोपीयन व आशिआटिक अशा अनेक संस्था, शास्त्रें व समाज ह्यांचें पृथक्करण करण्यांत ज्यानें वर्षेच्या वर्षे घालविलीं आहेत, अशा एखाद्या चतुरस्र इतिहासज्ञानें जर राष्ट्रसभेचें चरित्र लिहिण्याचें मनांत आणिलें, तर हजारों स्थूल व सूक्ष्म, प्रसिद्ध व गुप्त, क्षुल्लक व महत्त्वाच्या प्रसंगांचें योग्यायोग्यत्व, लघुत्वमहत्त्व व कार्यकारणत्व दाखवून तो जी हकीकत साध्या व समर्पक भाषेनें सांगेल तिच्यांत व उपरिनिर्दिष्ट तिघांच्यांत केवढें थोरलें अंतर पडेल ! चौघांनाहि द्यावयाची आहे झालेली हकीकतच. परंतु ज्याच्या त्याच्या अवांतर ज्ञानाच्या विस्तारा मुळें प्रत्येकाच्या हकीकतीचें वैचित्र्य निरनिराळ्या दर्जाचें उठेल, हें उघड आहे. हेंच अवलोकन—वैचित्र्य इतिहासलेखनांतहि दृष्टोत्पत्तीस येतें. ज्या देशांतील लोक देशोदेशीं प्रवास करतात, देशोदेशींचे समाज, धर्म, सारस्वत, संस्था, संस्कृति व इतिहास पाहून तुलनात्मक विचार करण्याची जेथें संवय झाली व देशांतल्या देशांत भौतिक शास्त्रांचें जेथें प्रणयन चाललें आहे, त्या देशांतील इतिहासकार झालेली हकीकत पध्दतशीर त-हेनें ज्या वैचित्र्यानें लिहितील तें वैचित्र्य परदेशांना बहिष्कार घालणा-या व परदेशीयांना अस्पर्श समजणा-या देशांतील इतिहासाकारांच्या हकीकतींत कसें येईल? अलीकडील पन्नास वर्षातल्या किंवा शेंदीडशें वर्षांतल्या यूरोपीयन इतिहासकारांशी मराठी बखरकारांची मी तुलना करीत नाही; तर दीडशें वर्षांपलीकडीस यूरोपीयन इतिहासकारांशीं करीत आहे. हे दीडशें वर्षांपलिकडले पाश्र्यात्य इतिहासकार मोठे नामांकित होते, अशांतला भाग नाहीं. कालानुक्रम कशाशीं खावा, ऐतिहासिक सत्य म्हणजे काय, पध्दती म्हणजे काय चीज आहे, वगैरे गूढें तत्कालीन पाश्र्चात्य इतिहासकारांना उकलली नव्हती, हें खरें आहे. ह्या इतिहासकारमन्यांची बकलनें उडविलेली टर सर्वश्रुतच आहे. सध्यांच्या मानानें पहातां तत्कालीन यूरोपीयन इतिहासकारांची यद्यपि इतकी निकृष्ट दशा होती, तत्रापि इतकें कबूल केलें पाहिजे कीं, तत्कालीन मराठी बखरकारांपेक्षां त्यांची दृष्टि जास्त विस्तृत झालेली होती. स्वदेशाच्या पलीकडे पृथ्वीवर अन्य देश आहेत व त्यांचे इतिहास लिहिल्याशिवाय मानव समाजाचा साद्यान्त इतिहास लिहितां यावयाचा नाहीं, हा सिध्दान्त त्यांना कळून चुकला होता. हा सिध्दान्त मराठी बखरकारांच्या स्वप्नींहि आलेला नव्हता.