Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

परंतु सामाजिक सुधारणेवरील त्यांच्या इंग्रजी व्याख्यानांत व निबंधांत Organisation discipline, वगैरे जे शब्द येतात, त्यावरून गीतेचें व दासबोधाचें वारें त्यांना कळत किंवा नकळत लागलेलें आहे, असें दिसतें. असो. (८) ह्या दोघांच्या तत्त्वज्ञानाला विरोधी असा एक पंथ सध्यां आर्यावर्तात कांहीं पाश्चात्य मंडळींनीं काढला आहे. त्या पंथाचा गूढ प्रवर्तक कोणी असो, परंतु त्याच्या हेतूची परीक्षा तत्पंथीयांच्या सामान्यत: भाषणांवरून व विशेषतः कृतीवरून यथास्थित करतां येतें मनुष्याच्या ठायी कांहीं अदृश्य शक्त्या आहेत व त्यांच्या जोरावर तो अद्भुत चमत्कार करूं शकतो, हें ह्या पंथाचें मुख्य तत्त्व आहे. हें अजब तत्त्व पुरातन आर्य लोकांचें असून, वर्तमान आर्यांच्या पुनरुज्जीवनार्थ तें आपण हिंदुस्थानांत पुन: जाहीर करीत आहों, असें ह्या पाश्चात्य लोकांचें म्हणणें आहे. ह्या अद्भुत शक्त्यांच्या जोरावर हिंदुस्थान पुन: उदयास येईल असेंहि हे लोक प्रतिपादितात. हवेंतून उडणें, पाण्यावरून चालणें, हजारों कोसांवरून पहाणें, वगैरे अमानुष सामर्थ्य पुरातन ऋषींच्या ठायीं जें होतें अशी कल्पना आहे, तें वर्तमान हिंदूंना अभ्यासानें येणें शक्य आहे; वगैरे थापा, हे लोक गंभीपणानें मारीत असतात व इकडील कित्येक मंदबुद्धि व आळशी “सुशिक्षित” लोक परम भक्तीनें त्या ऐकत असतात. या अद्भुत लोकांना “थिआसोफिस्ट” ही संज्ञा आहे. ह्यांचें तत्त्वज्ञान जर आधुनिक हिंदुसमाजांत प्रचलित झालें, तर अद्भुत शक्त्यांनीं व हटयोगानें पाश्चात्य प्रतिस्पर्ध्यांचा पाडाव आपल्याला सहज करतां येईल, अशी भावना हिंदुसमाजांत उत्पन्न होईल आणि उद्योग व भौतिक शास्त्रें यांकडे दुर्लक्ष होऊन, आलस्य व मांद्य यांचें साम्राज्य वाढेल. यूरोपीयन यंत्रशास्राचा पाडाव थियासोफिस्टांच्या मंत्रशास्रानें होईल, अशी कल्पना खोटी आहे. पाश्चात्य लोकांना मंत्रशास्त्रानें हाणून पाडण्याचा खुळा उद्योग, दुसरा बाजीराव, महादजी शिंदे, दौलतराव शिंदे, टिपू सुलतान वगैरे लोकांनीं केला होता. अद्याप ग्वालेर, इंदोर, नागपूर, बडोदें वगैरे स्थलीं जी द्राविड मंत्रशास्त्र्यांची घरें आहेत, तीं मंत्रशास्त्रानें यजमानाचा उत्कर्ष व शत्रूचा अपकर्ष होत नाहीं, असें स्पष्ट सांगत आहेत. थियासोफिस्टांच्या मंत्रशास्रांच्या सोडतींत उद्योगाचें मातेरें खात्रीनें होईल, असें पूर्वानुभव सांगत आहे. (९) थियासोफिस्टांच्या तत्त्वज्ञानाखेरीज, ख्रिस्ती तत्त्वज्ञान, सरकारी तत्त्वज्ञान वगैरे आणीक दहापांच तत्वज्ञानें सध्यां हिंदुस्थानांत प्रचलित आहेत. त्यांची परीक्षा करण्याचें काम विस्तरभयास्तव वाचकांकडेसच सोंपवितों.