Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

याचीं रुजुवात राजाजी देखत नवाबाजवळ करून देईन, तुह्मीं गोष्ट. मात्र काढावी, रघोत्तमराव याचे मसलहतीमुळें राजाजी चाल चालतात, घरचे नौकर आणि दौलतदार सर्वांची पायमाली करितात, यास काय ह्मणावें ह्मणून हाका मारितात. हें बोलणें आपल्यांत, सानिष करून बोलतात किंवा वास्तविक हेंही समजत नाहीं. मीर अलमाची चाल आडून तीर मारावा, लागू झालियास उत्तम, नाहीं तर अलग. मीं पुढारी होऊन एकास हातीं धरावें, तर दुस-यानें वाईट मानून दगड मजवर टाकावें. ज्यास हातीं धरिलें त्याचें सामर्थ्य निर्वाह करण्याचें ह्मणावें तर तेंही नाहीं. अदावळ लटकी आली तरी तेच पंचाईत करीत बसणार. नवाबाची कायम मिजाज असावी, तर जो कानाशीं लागतो तिकडे मर्जीचा प्रवाह, त्यांतही शाश्वत नाहीं. तेव्हां मला सर्वांचा संतोष राखणें प्राप्त. जुरत धरून कार्यावर पडतील, हें तर कोणाचेंही सामर्थ्य नाहीं. संतोष न राखिल्यास अदावळ नाहक आणून घालतील. याचाच विचार येऊन पडतो. उगीच अदावळी घालून काय व्हावयाचें ? परंतु पंचायती घालीत बसावें हें स्वरूपास योग्य नाहीं. स्वामीची सेवा करून दाखवावी, नवाबाची दौलतखाई करावी, दोहीं दौलतीची दोस्ती अधिक व्हावी, हें कार्य घडावें तें एकीकडे राहून, आपलीच पंचाईत आपण करीत बसावी, दुस-यांनीं तमाशा पहावा, हें उचित नाहीं, असें समजोन सर्वांचा संतोष आणि नाद लावून ठेविला आहे. मार्गाची गोष्ट होणें तेवेळेस होईल. तोहमत न यावी याजकरितां बहुत संभाळून चालतों. अबला यंत्र प्रबला बालो राजा निरक्षरो मंत्री । न हि न हि तत्र धनाशा जीवित आशापि दुर्लभा भवति ॥ " याप्रमाणें येथील प्रकार झाला आहे. यांतील अनेक विकृति आहेत. कोठपर्यत लिहूं। सारांश, नवाब कांहीं समजोत अथवा न समजोत. ज्यांत स्वामीचे आणि नवाबाचे दौलतीस जें चांगलें तें करावयाचें. नवाबासही समजत समजत समजेल. स्वामीचें लक्ष्य नवाबाचें दौलतीचे संरक्षणाकडे असावें. जयफी नवाबाची. या समयांत स्वामीनीं संरक्षणाची दृष्टि या दौलतीवर ठेवावी तरच कल्याण. मला आपण होऊन नवाबाशीं बोलतां येत नाहीं. स्वामीनीं लिहिल्यावर बोलावयास अनमान नाहीं. नेक सलाह खटपट न होतां रहस्यानें बंदोबस्त होईल, अशी सलाह लिहावी, आणि स्वामीनीं मनावर घ्यावें नवाब स्वामीचें ऐकणार नाहींत असें घडावयाचें नाहीं. नवाबांनीं बहुत पाहिलें, अनुभव घेतला, जईफ झाले. स्वामीचें जें लिहिणें त्याचा गुणच घेतील. त्यांतच कल्याण आहे. यासमयीं उपेक्षा न करावी. सर्व पत्राचें मनन यथास्थित होऊन आज्ञा व्हावी. र॥ छ ६ मोहरम. हे विज्ञापना.