Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२०६] श्री. ४ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना--मीर इमाम सुगुरवाल्याकडी जमीयतसुद्धां धनपु-याची झाडी धरून आहे. आसद आलीखान यांनीं मीर आलम यास धरलें ह्मणून वर्तमान उठलें होतें. परंतु तें गलत. मीर इमाम लोकसुद्धां धनपु-यानजीक आहे. आसद आलीखान तांडुरावर आपले लोकसुद्धां आहे. व्यंकटराव सुरापुरकर कुहिरावर लोकापल्लीस नारायणपेंठसुद्धां ठाणीं व्यंकटराव यांचीं गुटमटकलेस ठाणें दखल नाहीं. आसदआलीखानाच्या पुत्राकडे आहे. पेशजी मालकी, हूलसूर, निलंगें, आळंद, गुंजोडी पावेंतों अलीज्याह यांजकडील ठाणीं होतीं. बेदरावर मुसारेमू वगैरे सरदार आल्यानंतर ठाणें न्यातींतील लोक आपल्याजवळ बोलावून जमीयत एकत्र केली. गालबजंग संगारडी वगैरे फौजसुद्धां देगसूर वरवाल, साडबाड यारुखें गेले होते, ते तिकडे त्यांनीं धामधुम तालुक्यांत करून कोंडलवाडीचे पेटेसुद्धां लुटून तेही बेदरावर मिळाले. तैव्हां तालुक्यांतील ठाणीं अलीज्याह यांजकडील उठोन आली. नबाबाकडील अमीलांनीं दखल केलें. हल्लीं अलीज्याह यांचें जाणें ज्या रुखें तिकडे ठाण्याची गलबल आली. र।। छ २० र।।वल हे विज्ञापना.