Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[३३]                                                                               श्री.                                                                          ३ जुलई १७९५.

विनंति विज्ञापना. छ १० जिल्हेज रविवारी इदीचे दिवशीं पिछली प्रहर रात्र तेसमयीं अलीज्याह बहादूर साहेब ज्यादे यांस सदाशिव रड्डी घेऊन शहरांतून नवाबाचे देवडीवरून निघून गेला. या वर्तमानाची विनंति यापूर्वीं लिहिण्यांत आलीच आहे. साहेबज्यादे निघतेसमयीं तमाम येथील सरदार, पागावाले व नफरुद्दौला, कयामन्मुलूक व आसदअल्लीखान व समशेरजंग वगैरे व मीरपोलादअल्ली यांजकडे चोबदार अलीजाहां याजकडून बोलावूं गेले कीं, आह्मी निघालों, तुह्मी लवकर यावें. कोणाकडे असेही निरोप गेले कीं, हजरत बरामद झाले आहेत, इदीच्या जत्रेकरितां तुमची याद केली, लवकर यावें. अशा त-हेनें बोलावूं पाठविली. परंतु रात्रीचा समय. सर्वत्र अंदेश करून कोणी बाहेर निघाले नाहींत. आपलालें घरींच राहिले. नवाबाचे देवडीपाशीं जमीयतसुद्धां आल्यानंतर अर्ज सांगून पाठविला कीं, जमीयत येऊन मला घेऊन जातात. काय इर्षाद नवाबाकडील निरोप आला कीं, तुह्मी एकले येणें. वाड्यांतील बंदोबस्त चौकीपाहरा व दरवाजा बंद नवाबानीं करविले. चौकांतील वडाचे झाडाखालीं घटकापर्यंत बसून चार पांच घटिका रात्र राहतां साहेबज्यादे व सदाशिवरड्डी, नाजमन्मुलूक सुभा शहरचा व सैफजंगाचे दोघे पुत्र जमीयतसुद्धां साहेबज्यादेसहित घोड्यावर स्वार होऊन, पुढें चोबदार पुकारीत, मोर्चल होंत, याप्रमाणें नडव्याचे दरवाजानें कारवान लंगर हौदावरून पट्टण, चेरूचे मागें गेले. मार्गातच इदीच्या फात्या देऊन नजरा झाल्या. घटिका दीड घटिका रात्र अवशेष होती. तेवेळेस अलीज्याहां शहरांतून गेले. इसामिया याची दौड पाठीमागें गेली होती. परंतु ते मजबुतीनें स्वस्थतेनें गेले. कोणाच्यानें गांठ घालावी ही हिम्मंत न झाली. र॥ छ १५ जिल्हेज. हे विज्ञापना.