Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[३४]                                                                               श्री.                                                                           ३ जुलै १७९५.

विनंति विज्ञापना. अलीज्याहाबहाद्दर साहेबज्यादे शहरांतून निघून छ १० रोजीं प्रहर दिवसां लिंगपल्लीपट्टणवरू अलीकडे तीन कोस येथें स्वारी येतांच चरईस नवाबाकडील पागेचीं घोडीं. पन्नास पंचावन्न होतीं, व तीन चार हत्ती मीरअल्लम याचे वगैरे होते, ते घेतले. मार्गानें अल्ली महमदखान बीडवाला याजकडील कायत लिहिणार येत होता, त्याची दोन घोडी व चार पांच हजार रुपये नगदी ये होते, ते हस्तगत केले. पट्टणचरूस जाऊन तेथील पेठे लुटली. वित्तविषयं, मांडेंकुंडें, लोकांचे हातीं लागलें तें घेतलें. संगारडीस जाऊन मुक्काम केला. दुसरे दिवशीं रंगमा पेठ येथें गेले. सदाशिवरड्डी यांनीं साहेब ज्यादे यांस ज्याफत व नजर केली. सैफजंगाचे दोघे पुत्र समागमें आहेत. वडील पुत्र सारमजंग यास अर्जबेगीचें काम व धाकट्यास खजानचीचें सांगून वस्त्रें खिलत दिल्हा. बेदरास कांहीं लोक, स्वार, पायदळ हस्तगत करण्याकरितां दौड रवाना केली. पिलखाना व उष्ट्रखाना चरईस तिकडेच समीप आहे तोही हस्तगत करणार. साहेबज्यादे याजपाशीं जमीयत स्वार, पायदळ मिळून दहा बारा हजार, शिवाय नवे लोक येतात. त्यांस ठेवीत आहेत. कलम ज्यारी याप्रमाणें वर्तमानें येतात.
र॥ छ १५ जिल्हेज. हे विज्ञापना.