Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२०७] श्री. ४ आक्टोबर १७९५.
विनंति विज्ञापना--मीर अलम नवाबाची रुखसत घेऊन इंग्रजी पलटणें आघाडीस यांचे निघण्यापूर्वीं दरगाहा पुढें जाऊन उतरलीं होतीं. तेहे येकत्र होऊन पट्टणचरूच्या पुढें नाक पाहून राहिले. त्याजवर अलीज्याह बेदरावर जमीयतसुद्धां निघून गेले. याच्या अर्ज्या सरदारांकडील आल्या. नबाबांनीं पाहून मीर अलम यांजकडे पाठविल्या. मीर अलम दोन पलटणें इंग्रजी व तीन हजार सवार तैनातीसुद्धां त्याच जागीं मुकाम करून आहेत. नबाबांनीं बोलाविलेंही आहे. अद्याप बोलाविलें नाहीं. आह्मांस मीर अलमास लवकर रुखसत करणार होते. अलीज्याह यांचा रुख खंदाराकडे, हें वर्तमान आलियापासून आमचें त्यांचें रवानगीचें स्थिर आहे. शिकंदरज्याह यांचा मुहूर्तही अद्याप निघाला नाहीं. अलीज्याहचा रुख जसा दृष्टीस पडेल तसें करणार. मुसारेमू यांचे विद्यमानें सदाशिव रड्डी यांचें राजकारणाचें बोलणें नबाबांनीं कांहीं मान्य केलें. जाब गेला. त्यांचें उत्तर समजे तोंपावेतों मुसारेमूस बेदराहून पुढें जावयास हुकूम नाहीं. याप्रमाणें स्तब्ध आहेत. र॥ छ २० र।।वल. हे विज्ञापना.
छ २१ र।।वल, मु।। भागानगर
रवाना टप्यावर सोमवार.