Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[३०]                                                                               श्री.                                                                            ३० जून १७९५.

विनंति विज्ञापना. एहतषामजंग, नफरुद्दोला यांजपाशीं नौकर दोघे पठाण होते. त्यांची बरतरफी होऊन जंग मजकूर यांचा ऐवज त्यांजकडे फाजील .निवाला असतं छ २ जिल्हेज शनवारीं अडीच प्रहर दिवसां त्यांचे हवेलींत ते पठाण दिवाणखान्यांत होते. नफरुदौलाचा पुत्र अकरा बारा वर्षांचे वयाचा फारसीचा अभ्यास करीत तेथें बसला असतां त्याशीं पठाणाचें बोलणें कीं, नफरुद्दौलाशीं बोलून आह्मास फारखती देणें. मुलानें सांगितलें, हा कारभार आहे, मी लेंकरूं, मजकडे काय आहे, तथापि दरबाराहून ते आल्यानंतर त्यास तुह्मांविषयीं रदबदल करून पाहीन. हें बोलणें होत आहे, इतक्यांत नफरुद्दौला दरबार करून आले ते महालांत गेले. मूलही. उठून आंत जाऊं लागला. इतक्यांत एक पठाण दरवाजापाशीं उभा राहून, एक पठाणानें तरवार घेऊन मुलास सात आठ जखमा चालविल्या. जंग मजकूर याचे खिजमतगार वगैरे धांवून दोघे पठाण धरून तुकडे करून जिवें मारिले. मुलाच्या जखमा बांधविल्या. नवाबास वर्तमान कळल्यानंतर अशील मुलाच्या समचारस पाठवून जखम पट्टीकरितां तीन हजार रुपये देवविले. मी आपले येथील कारकून समाचारास त्याजकडे पाठविला होता. र।। छ १२ जिल्हेज हे विज्ञापना.