Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१८८] श्री. २५ सप्टेंबर १७९५.
विनंति विज्ञापना. मीरअलम रुखसत जाले. इंग्रजी दोन पलटणें अघाडीस रवाना केलींच आहेत. मीरअलम यांचे समागमें स्वार तीन हजारांचा भरणा नबाबांनी करून दिल्हा. पलटणासहित बेदरास जाऊन तळघांटी उतरण्याविशींची तजवीज आहे. मुसारेमू व पागावाले आदीकरून सरदार वरघांटीं आहेत. नबाबांनीं खासडेरेही छ १० रोज गुरुवारीं बाहेर उभे करविले. पलटणें व हे एकत्र होऊन जातील. र।। छ ११ र।।वल. हे विज्ञापना.