Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१४]                                                                                 श्री.                                                                           

विज्ञापना ऐसीजे. काल छे २६ तेरीखेस नवाबाकडे गेलों होतों. नवाब बाहेर निघाले नव्हते. त्याअगोदर मीरअलम व रेणूराव यांची गांठ पडली. एकीकडे बसलों. स्वैरयतीचा शिष्टाचार होऊन नंतर त्यास विचारिलें कीं, आह्मास येऊन महिना होत आला, आजपर्यंत प्रथम दिवसच आहे, हजरतीचे बोलण्याचा भाव समजत नाहीं, खावंदास काय लिहावें ? आह्याविषयीं तुमचे मनांत संशय आला असल्यास तुह्मीं आह्मांशीं स्पष्ट बोलावें, आमचे मनांत कांही आल्यास आह्मीं तुह्मांशीं बोलूं, जोंपर्यंत साफ बोलण्यांत आलें. नाहीं तोंपावेतों भ्रम आहे, तुमचे आमचे बोलण्यांत कोणी मध्यस्थ नलगे, निखालस बोलण्यांत आलें ह्मणजे आतांच तुह्मांस वाटेल. कीं, उगीच भ्रम वाटत होता, परंतु कांहींच नाहीं, इतकें बोलण्याचें कारण हेंच कीं, दोही दौलती कुलियात तुह्मीं आह्मीं मिळून संभाळावी, यांत अंतर दिसूं नये, इकडे दृष्टि सर्वानीं ठेवावी हें चांगलें. याजवर बोलिले जें, माझें ह्मणणें तुह्मांस इतकें आहे की, हजरत बरी वाईट गोष्ट बोलतात, याविषयीं तुह्मीं मनांत वाईट मानून असें बोलिले तेव्हां काय करावें, खाविंदास काय लिहावें ? भरंवसा कोणता धरावा ? असे संशय मनांत आणून या पैरवीस लागूं नये, खावंदाची मिजाज एक प्रकारची, आह्मीं येथें आलियावर आह्मांवर मिजाज दुरुस्त नाहीं ऐसें पाहिलें, तेव्हां लटकें लांडें कळलें तसें बोललों, नालिषही केली, आणि मर्जी संपादन करून घेतली, खरें बोलणें खावंदास बरें न वाटे, तेव्हां कसें करावें? असा प्रकार येथील आहे. तेव्हां त्यास ह्मटलें, याच गोष्टी अवघड, खावंदाची मिजाज कायम नाहीं, बोलणें नीट नाहीं, एवढ्या बोलण्यावर आह्मीं आपले खावंदास कांहीं लिहावें तर ठीक नाहीं, भलतेंच होईल, याजकरितां आजपर्यंत कांहीं लिहिलें नाहीं, परंतु किती दिवस प्रतीक्षा करावी, मजवर खावंदाचा शब्द येईल कीं नाहीं? यास काय करावें ? तेव्हां ह्मणाले, सर्व यथास्थित होईल, परंतु मला विचार मोठा पडला, आहे. नवाबास एक सवै हामेषाची आहे कीं, कोणी एक जण. पुढारी होऊन त्यानेंच याशीं बोलावें, त्याजवर नवाबांनीं भार टाकून त्याचे स्वाधीन करावें, त्याजपासून आपण जें पाहिजे तें समजत जावें, या धोरणेवर आल्याशिवाय गाडा ठीक चालत नाहीं, ती तर गोष्ट अद्याप कांहींच दिसत नाहीं, यास काय करावें?