Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१३०] श्री. २७ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमू व घासीमिया व अजमखान व इसामिया वगैरे सरदार नवाबाकडील जमीयतसुद्धां संगारडीपेठेवर येऊन पांच सात मुक्काम झाले. इसामिया हैदराबादेस नवाबाकडे येऊन दोन रोज राहून रुखसत घेऊन तिकडे पुन्हा गेले. मुसा जामबतिसा सरदार मुसारेमूकडील कृष्णापैलतीरीं तैनात होता. तो जठचरल्यावरून येथें आला. त्याचीही रुखसत नवाबानीं करून संगारडीकडे त्यास रवाना केलें. छ ६ सफरीं लिंगपेठेस जाऊन उतरला. त्याचे समागमें पयदळची जमीयत चार हजाराची आहे. छ ७ रोजीं पट्टणचरूस उतरून छ ८ रोजी संगारडीपेठेपाशीं मुसारेमू याचे लष्करांत प्रहर दिवसां दाखल झाला. मुसारेमूची अर्जी नवास केली कीं हुजुरांतून मुसा जामबत्तीसा याची रवानगी जमीयतसुद्धां जाली, तो येऊन षामील झाला. याउपरीं उदईक येथून कूच करून सदाशिवपेठेवर जाऊन उतरतो. त्याप्रमाणें छ ८ रोज मंगळवारीं मुसारेमू वगैरे सरदार जमीयतसुद्धां संगारडींतून कूच करून गेले. सदाशिवपेठेअलीकडे नाल्याचे पाण्यावर उतरले आहेत. अर्जीही आली. येथून त्यांजकडे बारूद, गोळे व बाणाच्या कैच्या वगैरे सरंजाम रवाना झाला आहे. पुढें होईल त्याप्रमाणें विनंति लिहिण्यांत येईल. र।। छ ११ माहे सफर. हे विज्ञापना.