Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१३३] श्री. २७ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. हैदराबादेंत दरवाजे शहरपन्हा व हवेली आदिकरून बंदोबस्त परवानगी, रसानगी व चौक्या याची येहतीयात रात्रंदिवस आहे. किल्ले गोवळकोंड्यांत तेजसिंग हजारी याचे निसबतीचे लोक ठेवून बंदोबस्त केला. समसाबाद फरोखनगर मोंगलगिद्याकडेही जमीयत थोडी थोडी आहे. सदाशिवरड्डीकडे येथून कोणी दीक्षित ह्मणोन ब्राह्मण अकबार लिहितो, हें वर्तमान नवाबास समजल्यावरून शहरांतील ब्राह्मण, तेलंग वगैरे धरून चौकशी करण्याविषयीं कोतवाल मोगलजान यास आज्ञा जाली. त्यावरून त्यानें ब्राह्मण जे शहरांत सांपडले ते एकशेंसव्वीस असामी धरून पहा-यांत ठेविले. इसम नवीशीची फर्द लिहून नबाबास अर्ज केला. दोन रोज ब्राह्मण पहा-यांत होते. त्यानंतर सोडून दिले. र॥ छ ११ माहे सफर. हे विज्ञापना.