[१३१]                                                                               श्री.                                                                  २७ आगष्ट १७९५.                                  
विनंति विज्ञापना. अलीजाबहादूर साहेब बेदरांत आहेत. जमीयत स्वार पायदळसुद्धां वीस पंचवीस हजारांचा भरणा होईल. चिंचोली, तांडूर वगैरे आसपासचीं ठाणीं घेऊन देगळूर, सारवाड, कोंडलवाडी इकडेही ठाणीं कित्येक जागा बसविलीं. शिबंदीचें देणें, खर्चाचा ताण, सबब भालकी येथें जमीयत साहेबजादे यांची जाऊन भालकीची लूट जाली. पांच चार लाख रुपयांचें वित्तविषय हस्तगत जालें. याप्रमाणें वर्तमान आहे. महमद अजमखान पागावाले यांचे पुत्र बंदेअल्लीखान दोन अडीच हजार जमीयतसुद्धां हुमणाबाद येथें आहे. त्याजवर सदाशिवरड्डीकडील जमीयत व हिजेखान ह्मणोन सरदार दोन तीन हजार जमीयतसुद्धां रवाना झाला. बंदेअल्लीखान बाहेर निघून त्यांचा यांचा मुकाबिला झाला. त्यांत दोन तीनशें लोक इकडील व दोन तीनशें त्याजकडील ठार जखमी होऊन जमीयत माघारी आली. रड्डीकडील हिजेखान सरदार ठार झाला. याप्रमाणें एक वर्तमान. दुसरें वर्तमान ऐसेंही आहे कीं, यांची त्यांची लढाई होऊन बंदेअल्लीखान याची शिकस्त झाली. सबब हुमणाबादेस न जातां निघोन गेला. याप्रमाणेंही वर्तमान आहे. खचीत समजण्यांत येईल तशी विनंती लिहीन. र॥ छ ११ माहे सफर. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries