Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१२८] श्री. १८ आगष्ट १७९५.
विज्ञापना एसीजे. मीर सुभानअल्ली फेरुदुंजाह साहेबजादे राजश्री नानांस येदगिरीवर इस्तकहाल नवाबांनीं पाठविलें. त्यांचे घरीं छ २९ मोहरमीं १५० गाडदी नवाबांनीं पाठवून, पहिले उठवून नवे बसविले. कांहीं पहारे जाजती ठेवले. पांच सात माणसें खिदमतगार वगैरे षागीर्दपेषाचीं व एक मोदी वाणी इतक्यास धरून नेऊन, तोकजंजीर करून, कैद केलें. यांतील कारण फितुराचे किंवा आणखी कांहीं हें समजलें नाहीं. शोध करून मागाहून लिहून पाठवीन शहरचे दरवाजावर बंदोबस्त फार झाला. येथून टप्पा रवाना करणें अथवा तिकडून येणें तो दरवाजावर अटकतो. नवाबाची परवानगी खाशांचा हुकूम होऊन चोबदार जाऊन दरवाज्यास परवानगी सांगावी तेव्हां टप्याचीं पत्रें जासूद घेऊन बाहेर जातात अथवा येतात. याप्रमाणें झालें आहे. र।। छ २ सफर. हे विज्ञापना.
छ ११ सफर मु।। भागानगर
गुरुवार रवाना टप्यावर.