Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१२७] श्री. १८ आगष्ट १७९५.
विज्ञापना ऐसीजे. इंग्रजी दोन पलटणें आपले ठिकाणाहून निघून पांच संहा मजली आलीं. पंधरा दिवसांत हैदराबादेस येऊन पोहोचणार. याप्रमाणें इंग्रजाचे वकिलांनीं नवाबास सांगितलें. त्याजवरून मर्जी प्रसन्न आहे. त्यांचे येण्याची प्रतीक्षा आहे. ते आल्यावर सर्व जमाव एकजड करून बेदरावर रवाना करणार. श्रीमंतांकडील पत्राचे जबाब अद्याप कां येत नाहींत ह्मणोन एक दोन वेळ नवाबांनीं विचारलें. तयार झाले आहेत, लौकरच रवाना होतील, असें उत्तर मला आलें. दंग्यामुळें मार्गांत अटक झाली असल्यास नकळे, असें उत्तर दिल्हें. त्यास उत्तराविषयीं लवकर आज्ञा जाली पाहिजे. नवाब फार इंतजारी आहेत. र॥ छ २ सफर. हे विज्ञापना.