Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१३२] श्री. २७ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मिरइमाम जमीनदाराकडील पेशजी जमीयतसुद्धां जठचरल्यावर येऊन, मुसाजामबत्तिसा यासीं लढाई करून, झाडींत निघून गेला. मुसामजकूर जमीयतसुद्धां हैदराबादेकडे. आल्यानंतर हालीं मिरइमाम पांच सहा हजार जमाव व स्वार पायदळसुद्धां राजापूर तालुक्यांत येथून पस्तीस कोसावर नमूद जाला. याप्रमाणें वर्तमान नवाबाकडे आलें. फरोखनगरावर यांजकडील सरदार फकरुदौला वगैरे पांच सातशें जमीयत आहे. मीरइमाम राजापुराहून कोणीकडे जातो येतो हें वर्तमान येईल त्याप्रमाणें विनंती लिहिण्यांत येईल. र।। छ ११. माहे सफर. हे विज्ञापना.