Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१३४]                                                                               श्री.                                                                  २७ आगष्ट १७९५.                                
विनंति विज्ञापना.

१ अलीजाहबहादूर यांजकडे नोकरी वगैरे बहाण्यानें आपले तालुक्यांतून कोणी जाऊं नये व इंग्रजी दोन पलटणें नोकरीस होतीं तीं हल्लीं परतून माघारी बोलविलीं. त्याचे इतल्ल्याचे दोन खरिते नबाबानें दिले ते. स्वामीकडे पाठविले होते. त्याचे जबाब दोन सरकारचे खरिते छ २९ मोहरमीं राजश्री गोविंदराव भगवंत यानीं रवाना केले, ते छ ६ सफरीं पावले. नबाबाकडे जाऊन दोनी खरिते प्रविष्ट केले.

१ किस्तीचा ऐवज अखेर सालीं यावयाचा, अद्याप ऐवज येत नाहीं, याविषयीं नवाबासीं खरितापत्र पाठविलें. तुमचे विचारास आल्यास द्यावें, नवाबासीं बोलून हप्त्याचा ऐवज लवकर येई तें करणें, ह्मणून छ १९ जिल्हेजचें आज्ञापत्र व खलिता आला तो पावला. अलिजाहप्रकरणीं खरित्याचा जबाब सरकारांतून यावयाचा तोपावेतों ठेविला होता, तो हल्लीं या पत्राबराबर नबाबास पावता केला.
------


दोन कलमें. सदरहू तीन खरिते नबाबांनीं वाचून पाहिले. नंतर बोलिले कीं, अलिजाहबहादूर यांचे प्रकरणीं तदबीर मनांत येते ते लिहून पाठवावी ह्मणून मुसना खरिते मागाहून दिल्हे, त्यांचा जबाब आला नाहीं, पूर्वीं पत्रें पाठविलीं त्याचा मात्र जबाब आहे, त्याचा जबाब केव्हां येईल, त्याची इतंजारी आहे, त्यास तींही पत्रें पाठवावी. जबाब लवकरच येतील ह्मणून बोलिलों. उपरांत दोन तीन घटका दौलतीचे, समारंभाची व एहसानाची बोलणीं बोलत होते. सरकारचे जाबसालाविषयीं बोलिले. त्याचा मजकूर अलाहिदा लिहिला आहे. त्यावरून ध्यानास येईल. अलिजाह यांचे तदबिरीविषयीं काय सलाह ह्मणून नबाबाचे खरिते मागाहून रवाना केले त्याचे जाब स्वामीचा कदम दरमियान रहावा याप्रकारें समर्पक यावें. छ ११ माहे सफर. हे विज्ञापना.