Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१२६] श्री. १८ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमूकडील लयनेचे लोक कृष्णा पैलतीरीं अमीनखान अरब यांचे तैनात होते ते तेथून निघून हैदराबादेस येत असतां मार्गी जठचरल्यानजीक मीरइमाम सुगूरवोल जमीनदारीणीकडील जमीयतसुद्धां येऊन त्यानें गाठलें. यांची त्यांची लढाई होऊन चार पांचशें लयनेपैकीं लोक ठार जखमी करून मीरइमाम निघून झाडींत गेला. येथें वर्तमान येतांच नफरुदौला, भारामल वगैरे सरदार रवाना झाले. समसाबाद फरोखनगरास गेले, तों मीरइमाम गेल्याची खबर समजल्यावरून सरदार माघारे शहरास जमीयतसुद्धां आणविले. ते आले. मुसारेमूचे लयनेचेही लोक जटचरल्याहून निघून फरोखनगर समसाबादेहून शहरास आले. लंगर हौदापाशीं उतरले. तीन साडेतीन हजारांची जमीयत पैदलची आहे. मीरइमामाचे लढाईंत कितेक जखमी घायाळ तेही आहेत. नसरुद्दौला वगैरे येथून सरदार गेले होते. ते ताडबनांत हुकमाबमोजीब उतरले आहेत. पटणचरूवर हंगामा झाल्यापासून जागजागा नाकेबंद्या व बंदोबस्त बहुत आहे. इतक्यावर होईल त्याची विनंति लिहिण्यांत येईल. मिरइमाम यानें पानगळ व घनपु-याचा किल्ला व कोयलकुंडा हीं ठाणीं किल्लेसुद्धां घेतल्याचें वर्तमान आहे. कृष्णेपलीकडे मुसारेमूचे लोक होते ते सरदारसुद्धां आले. मुसाजामबत्तिसा वगैरे लयनेचे सरदार यांची मुलाजमत नजर झाली. दोन ताफा थोर गोळ्याच्या व एक गरनाळ मुसाबतीसाकडे दिली. मीरइमाम व आणखी कोणी जमीनदार आहेत, त्यास घनपु-याचा किल्ला त्यांनीं घेतला. पानगळची खबर पक्की अद्याप आली नाहीं. कोयलकुंड्याची अफवा आहे. खबर नाहीं. र॥ छ २ सफर. हे विज्ञापना.