[१२५]                                                                               श्री.                                                                  १८ आगस्ट १७९५.                                  
विनंति विज्ञापना. मुसारेमू व घासीमिया व अजमखान वगैरे नवाबाकडील सरदार आंदोलाहून संगारड्डीकडे येणार. ते वंजरा पैलतीरीं नदीचे पाण्यामुळें अटकून नांवा टोंकरें आणवून नदी उतरावयास आरंभ केला. मुसारेमू कडील लोक तीन चारशेंपर्यंत वंजरा उतरून अलीकडे आले. इतक्यांत सदाशिवरड्डीकडील चारपाचशें स्वार एकाएकीं, घासीमियाकडील लोक ह्मणून मुसारेमूचे लोक अलीकडे उतरून आले, त्यांजवर जाऊन हत्यार चालविलें. दोनशें ठार झाले. कांहीं फरारी झालें. याप्रमाणें होऊन सदाशिवरड्डीची जमीयत निघोन गेली. लोक जाया झाले. याप्रमाणें वर्तमान नबाबाकडे आलें. हल्लीं मुसारेमू वगैरे सरदार यांचे लोक वंजरा नदी उतरून संगारड्डीकडे आले. याप्रमाणें खबर आली. तेथून इसामिया पन्नास स्वारसुद्धां शहरास आले. छ २८ मोहरम शुक्रवारीं इसामिया नबाबाकडे दरबारास येऊन तिकडील मजकुराचा अर्ज केला. मुसारेमू व घासीमिया व अजमखान वगैरे सरदार संगारड्डीस दाखल झाल्याचें वर्तमान आहे. इसामिया खर्चास मागावयाकरितां आला. त्यास पन्नास हजार किंवा साठ हजार रुपये देऊन काल छ ३० मोहरमीं रात्रीं रुकसतीचें पानदान दिलें. आज उद्यां एका दोहों दिवसात जातील. र।। छ २ सफर. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries