Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१८५] श्री. २४ सप्टेंबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. आलीज्याह यांजकडून बोलणें लागलें त्याविशीं नबाबाजवळ बोलावयाकरितां इसामिया आले. त्यांनीं वर्तमान नबाबास सांगितलें. बोलणेंही मार्गाचें आहे. त्याचा तपशील ऐकिला तो उदईक लिहीन. नवाबानीं सर्वांस सलाह पुशिली. मीरअलम आदिकरून सर्वांचें मत कीं, समेट करून घ्यावा हें चांगलें. नबाबाचें मत, हें कांहीं करूं नये, अलीज्याहानें उठोन यावें, ह्मणजे त्याचें संरक्षण करीन. सर्वांचे मानस, समेट व्हावा हें चांगले. जिंदीखालीं टाकूं नये. परंतु नवाबाचे मर्जीकरितां रदबदल करून बोलूं सकत नाहींत. याप्रों। वर्तमान आहे. र।। छ १० माहे र।।वल. हे विज्ञापना.
छ ११ रा।वल मु।। भागानगर.
रवाना टप्यावर.