Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११८] श्री. १२ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. रायराया रेणूराव धोडाजी यांस बाहेर डेरे देऊन लोक जमा करण्याविषयीं सांगितलें. घोडेस्वार यांची हजरी, मणती, मिसल, दाग, चेहेरे. पाहून खर्चास व मसादा देणें हें करावें. याप्रमाणें सांगोन मशारनिले बाहेर जाऊन उतरले होते. सरदारांस मसादाही कांहीं दिल्हा. पांचशेंपावेतों लोक जमा केले. त्यानंतर ज्या लोकांस जमियतीकरितां ऐवज दिल्हा त्यांजकडे मागील फाजलाचा ऐवज येणें हें राशेनराव यांनीं समजाविलें. नबाब राजाजी यांजवर रुष्ट होऊन मसादा दिल्हा. तो ऐवज माघारा सरकारदाखल करणें ह्मणोन तगादा लागला. राजाजी बाहेर राहिले होते ते शहरांत आपले हवेलींत येऊन राहिले. भारामल यास नेमून दिल्हे. घोड्यावर दाग व मिसल हेंही काम राजाजीकडे होतें. त्यास दाग छ २४ रोजीं मागोन नेले. मिसलही त्याजडील तूर्त राहिलीं. याप्रमाणें आहे. र।। छ २६ मोहरम. हे विज्ञापना.