Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११६] श्री. १२ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. महाबतजंग याजकडील तालुका अदवानी, रायचूर, कवताल, भनू वगैरे येथील काम व्यंकटराव सुरापुरकर यांजकडे नवाबानीं सांगोन महाबतजंगाचा पुत्र गुलाम हुसेनखान यास महाबारी नेमून दिल्ही. त्याप्रमाणें महाबारीचा ऐवज द्यावा. रायचुरांत त्यास ठेऊन ह्याप्रमाणें चालिले. तालुका व ठाणीं व्यंकटराव याजकडे होतीं. सांप्रत चहूकडे हंगामा, सबब नबाबानीं महाबतजंगाकडील कारभारी अनवरुद्दौला, हैदराबादेंत होता, त्यास येथून रवाना केलें कीं, तुह्मीं महाबतजंगाचे मुलापासीं राहोन, शिबंदीचा वगैरे बंदोबस्त करून फंदफितुर न होय, ऐसें करावें. त्याप्रमाणें अनवरुद्दौला रायचुरास येथून गेले. त्यास पंधरावीस दिवस झाले. द्दोलामजकूर तेथें जाऊन व्यंकटराव याजकडील ठाणीं तालुक्यांत होतीं तीं दरोबस्त उठवून दिल्हीं. तालुक्यांत व ठाण्यांत आपली सिबंदी ठेऊन मजबुती केली. किल्ला व ठाणीं गढ्यातालुक्यासुद्धां बंदोबस्त महाबतजंगाचे मुलाचे नांवें अनवरुद्दौला यानें केली. हें वर्तमान नवाबाकडे आलें. व्यंकटराव यांचीहीं अर्जी गुजरली. या वर्तमानाची विनंती ऐकिल्याप्रमाणें यापूर्वीं ही सरासरी लिहिली होती. खचित वर्तमान समजलें त्याचीहि विनंती लिहिली असे. र॥ छ २६ मोहरम. हे विज्ञापना.