Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११९] श्री. १२ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मुसारेमू व घासीमिया व अजमखान व इसामिया व जोतसिंग खंदारकर वगैरे सरदार जमियतसुद्धां आंदोलाहून दोन कोस वंजरानदीचे पैलतीरीं आहेत. टोकरे नदींत घालून जमियत उतरून अलीकडे येत आहेत. सर्वांचा उतारा जाल्यानंतर संगारडी पेठेस येणार. नदी उतरतां एक टोकरा बुडाला, ह्मणोनही वर्तमान आहे. तहकीक समजल्यावर लिहिण्यांत येईल. मुसारेमू वगैरे सरदार आहेत त्यांची खर्चाचीही बहुत अडचण. जोतसिंग खंदारकर यास फाकेकसी होत आहे. कर्जवाला तेथें मिळेना, सबब त्याचीं माणसें व पत्रें शहरांत कर्जाकरितां कोणाकोणाकडे आली. याप्रमाणें अवस्था. धारणही त्यांचे लष्करांत महाग ह्मणून वर्तमानें येतात. याजवर जें ऐकण्यांत येईल त्याची विनंति लिहीन. र।। छ २६ मोहरम. हे विज्ञापना.