Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११७] श्री. १२ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. संस्थान अदवानी येथील स्वराज्याचा ऐवज सन् १२०४ पासोन महालीफडच्याविषयीं अमीलाचे नांवें इनायतनामे यांची परवानगी राजाजीस जाली. मशारनिलेनीं इनायतनाम्याचा मसविदा केला. त्यास सांप्रत राजाजीस विचारिलें कीं, इनायतनामा कोणाचे नांवानें होणार. राजाजीनीं व्यंकटराव याजकडे तालुका, त्याचे नांवें इनायतनामा तयार करवितों, ह्मणून सांगितलें. याजवर राजाजीस विचारिलें कीं, व्यंकटराव यांचीं ठाणीं उठवून अनवरुद्दौलानीं महाबतजंगाचे पुत्राचीं ठाणीं घातलीं, बंदोबस्त केला, ह्मणून वर्तमान ऐकतों, तेव्हां व्यंकटराव याचे नांवें इनायतनाम्यानें काय होतें, हें वर्तमान खचित किंवा व्यंकटराव यांचे याजकडेच तालुका ह्मणून सहजात विचारिलें. हें ऐकून राजाजी हांसून बोलिले, काय असेल असो. इतकेंच. यावरूनही अनवरुद्दौलानीं ठाणीं व तालुक्याचा बंदोबस्त केल्याचें खचत दिसण्यांत आलें. र।। छ २६ मोहरम. हे विज्ञापना.