Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११४] श्री. १२ आगष्ट १७९५.
विनंति विज्ञापना. अलिजाहबहादूर यांजपासीं स्वार पयेदल जमियत वीस हजारपर्यत जमा होऊन सदाशिवरड्डी यानें आपलें तर्फे फौजेच्या तीन टोळ्या केल्या. एक टोळी, मुसारेमू व पागावाले वगैरे नबाबाकडील सरदार वंजरा पैलतीरीं आहेत त्यांचे रुखावर, व एक तुकडी तांडूरकुहीर या मार्गानें हैदराबादेचे सुमारें, व एक तुकडी बेदरचे पश्चिमेस दोन तीन कोस, याप्रमाणें रवाना केल्या ह्मणोन एक वर्तमान. दुसरें हुमणाबाद येथें अजमखान यांचे पुत्र बांदेअल्लीखान ह्मणोन जमियतसुद्धां आहे. सदाशिवरड्डीचे लोकांची व त्याची पहिले एक वेळ लढाई झाली होती. हल्लीं सदाशिवरड्डीकडील जमियत हुमणाबादेस जाऊन मोर्चेबंदी केली. ऐसेंही वर्तमान आलें. व तिसरी खबर, सदाशिवरड्डी जमियतसुद्धां बेदराहून निघोन, संगारडी अलीकडे चार कोस, बेदराहून बाराकोस, मौजे चिडकिडे हा गांव येथें उतरले. मुसारेमू वगैरे नवाबाकडील सरदार यांजवर येऊन पडावें हा इरादा ह्मणोन वर्तमान. याप्रमाणें वर्तमानें नित्य नूतन येत आहेत. वास्तविक काय असेल तें असो. जे ऐकण्यांत आलें त्याची विनंती लिहिली आहे. र।। छ २६ मोहरम. हे विज्ञापना.