[१२०]                                                                               श्री.                                                                 १२ आगस्ट १७९५.                                  
विनंति विज्ञापना. अलिजाहबहाद्दूर याजकडील जमियत दोन हजार स्वार व दोन हजार पयेदळ सदाशिवपेंठेचे मार्गे रुद्रवरं येथें येऊन तो गांव लुटून ताराज केला. पटणचरूचे हिफाजतीकरितां अगोदर नवाबानीं सिताबराव अमील यांस तेथें चार पांचसें पयेदल जमियतसुद्धां पाठविलें. त्याजला रुद्रवरं येथें जमीयतं आल्याचें वर्तमान, संमजतांच त्यानें अर्जी नवाबास लिहून शहरास पाठविली. ते अर्जी घेऊन हरकारा आला. त्याजला दरवाजापाशीं अटक जालीं. अर्जी पोंहचली. त्याचे मागेंच सिताबराव पट्टणचराहून निघाला. अलिजाह याजकडून चार हजार जमियतसुद्धां रुकनुद्दिखान सरदार रुद्रवरं येथील वषट्कार करुन पट्टणचरास जमियतसुद्धां आला. पट्टणचरू लुटून साफ केली. सिताबराव पूर्वीं निघोन, शहराचे दरवाजावर येऊन, नबावास अर्जी पाठविली. पट्टणचरू मारलें, खबर आला, त्यावरून नबाबानीं छ २५ रोजीं दोन प्रहर दिवसां राजे रायराया रेणूराव यांस बाहेर त्यांचे मुकाबिल्यावर निघण्याविषयीं सांगितलें. दहा हजार रुपये खर्चास देविले. राजाजी शहराबाहेर पांच चारशें स्वार पयेदलसुद्धां निघाले. वाड्यांतील बंदोबस्त बारगीर आणून नबाबानीं करविला. याप्रमाणें छ २५ रोजचें वर्तमान आहे. पट्टणचरूवर लोक कित्येक जखमी झाले तेहि शहरांत आले. माणसांचीं नाकें काने घेतात ऐसेंहि वर्तमान ऐकण्यांत आलें. छ २६ मोहरम. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries