Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११३] श्री. १२ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. मीरइमाम सुगूरकर जमीदाराकडील यानें जमियतसुद्धां येऊन घनपुरा व जठचरक तालुका हैदराबादेपासोन दक्षिणेकडे तीस पस्तीस कोश येथील नवाबाकडील ठाणीं उठवून दखल केला. जठचरक येथें जमियतसुद्धां मीरइमाम होता. इतकियांत मुसारेमूकडील लयेना महमद अमीखान अरब याचे तैनात कृष्णा पैलतीरीं होत्या. त्या तेथोन निघोन कृष्णा उतरून हैदराबादेकडे येत असतां त्यांनीं मिरइमाम यास जठचरक येथें एकबयेक येऊन गांठलें. लयेनचे लोक येतात हे खबर त्यास नव्हती. मिरइमाम बेफामीनें असतां लयेनाचे लोक पोहोंचून जठजरक येथें वेढा घातला. तेसमयीं मिरइमाम आपले जमावसुद्धां निघोन त्यांची यांची लढाई जाली. जठपोळ वगैरे आसपासचे जमीदार यांची कुमक समयास मिरइमाम यास पोंहोचून लढाईंत चार पांचशें लयेनेचे लोक ठार जखमी झाले. मिरइमामाचेही कित्येक ठार जखमी होऊन जमियतसुद्धां सांभाळून तो तेथून निघोन झाडींत गेला. याप्रमाणें वर्तमान नबाबाकडे आलें. येथून मीरइमाम यांचे तंबीकरितां भारामल्ल व नफरुदौला व दौलतखान वगैरे सरदार चार पांचशें स्वार व गाडदी या जमीयतसुद्धां छ २३ रोजीं रवाना जाहले. समसाबादेस पांच कोस जाऊन राहिले. छ २४ रोजीं फरोखनगरास गेले. पुढें होईल त्याची विनंती लिहिण्यांत येईल, दुसरें वर्तमान कीं, मुसारेमूची लयेन वाटेनें येत असतां मिरइमाम झाडीत होता. तेथून एकाएकी जमियतसुद्धां लयेनेवर येऊन झटपट झाली. शेवटीं लयेनेचे लोक जठरकाचे आश्रयास येऊन राहिले. मीरइमाम हें कृत्य करून निघून गेला. याप्रमाणें एक खबर आहे. त्या रुखावर समसाबाद येथील नाक्यावर नफरूदौला वगैरे जमीयत ठेवावी येविसी यांजकडील एकविचार आहे. र।। छ २६, मोहरम. हे विनंती.