Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१२१] श्री. १२ आगष्ट १७९५.
विनंवि विज्ञापना. पटणचरु लुटलें व मिर इमाम दक्षिणेकडे जमियतसुद्धां, याजमुळे शहरांत व बाहेरील पेठा येथें गडबड व घाबरेपणा भारी जाला आहे. नबाबांनीं हवेलीचें जलोहखान्यापुढें एक तोफ ठेविली. व जडव्यावर एक तोफ. जागजागा चौक्या नाकेबंद्या केल्या. ह्यावरून लोक फार हवालदील झाले. दम पुरेना. सबब कारवानचे दरोबस्त लोक चीजवस्त मुलेंमाणसेंसमवेत लोक गोलकुंड्यास गेले व जात आहेत. कारवानाहून किल्ल्यास एक गांठोडें नेणें तर त्यास मजुरी एक रुपया जाली आहे. पट्टणचरूचें वर्तमान येतांच नबाबांनीं राजाजीस चार पांचशें जमियतसुद्धां गोवर्धनाचे बागाकडे पाठविलें. तीनशें गाडद दारूगोळीसुद्धां एके नाक्यावर ठेविलीं आहेत. देवडीवर बारगीर व गाडद्यांची दाटी दारूगोळी तमाम सर्वांस वांटून दिल्ही. छ २५ रोजीं शहरांत मोठी गुल व खळबळ झाली. बेगम बाजार वगैरे पेठा शहराबाहेर आहेत. तेथील तमाम लोक शहरांत आले व येतात. छ मजकुरीं रात्रीं नबाबांनीं हवेलीचा बंदोबस्त बहुत करविला. बाणाच्या कैच्यांचे उंट पंचवीस देवडीवर आणविले. नफरुद्दौला वगैरे सरदार फरोखनगराकडे रवाना केले होते, त्यांजकडे षुतरसवार रवाना करून सरदार जमियतसुद्धां ताडबनांत आणविले. याप्रमाणें गडबड आहे. यावर होईल त्याची विनंती लिहिण्यांत येईल.
र।। छ २६ मोहरम. हे विज्ञापना.