Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[११२] श्री.
अखबार पारसी बेदरची नबाबाकडे आली त्याचा तरजुमा.
अखबार किल्ले बिदर तागायत छ २० मोहरम सन १२०५ हिजरी. बेदरचे किल्ल्यांत हजार स्वार व दोन हजार पायदळ आहे. नबाब अलिजाबहादूर लालबागांत रहातात. लालबाग ह्मणजे बेदरचे किल्ल्यांत हवेली जेथें नबाब होते तेथें. सदाशिवरड्डी तालबजंग यांचे बागांत राहतात. हा बागही शहरपन्ह्याचे आंतच आहे. बेदरांत चौबा-याचा बाजार आहे. तेथें बुरूज मोटा आहे. त्या ठिकाणीं हुसेनीसाहेब ह्मणून मशायख पीरजादा आहे. त्यांचे लेकीशीं अलिजाबहादूर यांनीं छ ११ मोहरमीं निका लाविला. राजे राजंणा चौदरी सदाशिवरड्डीचा बाप व सदाशिवरड्डीची आई उभयतां सदाशिवरड्डीस ह्मणतात कीं, अलिजाबहादूर यांनी कुच केलें, तर त्यांचे हमरा रिकाब असावें, त्यांजवेगळें एकट्यानेंच कोठें जाऊं नये, अगर तूं एकटा गेलास तर आह्मीं मुलेंलेकरेंसुद्धां विहिरींत उड्या टाकूं. नजीमन्मुलूक सफेजंग यांचा धाकटा पुत्र एक हजार स्वार व दोन हजार पायदळसुद्धां कल्याणाकडे रवाना झाला. मौजे कोसम परगणें भालकी येथें उतरला होता. बंदे अल्लीखान अजमसाहेब यांचा पुत्र, यानें हुमणाबाद, कलबोगें, व कल्याणी येथील बंदोबस्त करारवाके केला. कलबोर्ग्याचे किल्लेदार यांस लिहिलें कीं, जमीयत येत आहे, यास्तव हुषारी व खवरदारी असावी, व खंदकामध्यें तळ्याचें पाणी सोडावें. त्यावरून खंदकांत किल्ल्याचे पाणी ज्यारी आहे. बंदेअल्लीखान यांजपाशीं हुमणाबादेंत एक हजार पागा व एक हजार प्यादा नवनिगादास्त केला.
भोजरड्डी जमीदार इंदूर बोधनवाला सदाशिवरड्डीच्या तर्फेनें जमियत पांचशें स्वार व आठशें प्यादा कुहिरांत राहिला आहे. त्याचा इरादा आहे कीं, राजे प्रकाशवंत व्यंकटराव सुरापुरकर यांचा पुत्र चिंचोलीच्या नवाहांत आहे, त्यास ताख्तताराज करावें. कसबे हुसें येथें दोन हजार पांचशें स्वार पागेचे व दोन हजार प्यादा सरदारउन्मुलूक घासीमिया याकडील आहेत. पागेचीं घोडीं राजूर, वरबाळ, व कोंडलवाडी, व रुदरुर व पोतंगल, व कोटगीर, वगैरे हुशांत मिळालीं आहेत.
नवाब अलिजाह व सदाशिवरड्डी यांचा इरादा आहे कीं, चार हजार प्यादा व दोन हजार स्वार यांस अजदरजंग मुसारेमू याजवर षबखुन पाठवावा. अलीजाहबहादूर याजपाशीं दरोबस्त जमीयत पांच हजार स्वार व बारा हजार प्यादा आहे. स्वारास खर्चास दररोज एक रुपया व प्याद्यास आठां दिवसां एक रुपया, याप्रमाणें देतात.
हसनाबाद परगणा ठाणें न्यालकल येथें ठाणी अलिजाहबहादूर याजकडील कायम व मामलत ज्यारी आहे.
पिंपळखेड्यांत पागेचीं घोडीं सरकारचीं होतीं. त्यापैकीं बारा रास बछोरे व सोळा रास पसूघोड्या बंदेअल्लीखान यांनीं हुमणाबादेस नेलीं. बाकी सहा रास बछोरे व बारा रास घोडे अलिजाहबहादूर यांचीं माणसें घेऊन गेलीं.
निरख गल्ला दर रुपयास वजन पक्के.
८।२ गहूं. ८।२ तांदूळ. ८८२ तूप.
८।८ जोरी. ८८६ गूळ. ८।१ हरभरे.
सदरहूप्रमाणें निरख आहे.
कलमें सुमारें चौदा.