Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१०]                                                                                 श्री.                                                                           १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. राजे रेणूरावजी व रघोत्तमराव आले होते तेवेळेस सहजांत त्यास पुशिलें कीं, लोकांत षोहरत फार झाली आहे कीं, नवाबास खरड्यावर खिपत बसली, त्याविषयीं रात्रंदिवस निजध्यास आहे, याजकरितां इंग्रजास षरीक करून घेऊन याचा बदला करावा ह्मणून राजकारण ज्यारी आहे. त्यास हीं षोहरत दहाकरितां किंवा वास्तविक आणि या भरंवशावर हजर फडच्यासाठीं ढील करितात कीं, काय? इंग्रज बहुत दुरंदेश आहेत. केवळ लालचीवर दृष्टि देतील असें नाहीं. जी निर्दोष कळच त्याचा अंगीकार करतील. त्यांत दोष आणि नुकसानी त्याविषयीं हरगीज कळूच करणार नाहींत. यांचा पल्ला फार आहे. आहद कर्नाटक तहत बंगाला अनर्य. तेव्हां गोष्ट कठीण. तुमचे भरंवशियावर षराकत करावी तर तुमचा अनुभव त्यास आला आहे. यांत परिणाम नाहीं. श्रीमंत व नवाब दोही दौलतींतील गोष्ट नफानुकसान याच दौलतींत असणें हीच सल्लाह.-कदाचित् दोस्तीच्या पोटीं रियासत सुरुवात होणें याचा संभव तरी आहे. इंग्रजाचे घरांत जें जाईल तें पायां पडून घेईन ह्मटल्यास यावयाचें नाहीं. मसलत देणारांनीं विचार पहावा. तुह्मीं नवाबाचे नोकर आणि दौलतखा मातबर समंजस आहां. दौलतीस धक्का बसलियावर प्रस्तुत दु-या ईंत नमूद तुह्मीं व्हाल. तेव्हां त्यांचा उद्गार निघाला कीं, हल्लींचे षिकस्तेची गैरत आणि परमिंदगी नवाबास फार झाली आहे, याजमुळें चैन नाहीं, इंग्रजांस फरासीसाची मसलहत आणखी सख्त अशी येऊन पडली आहे कीं, त्याला दुसरें कांहीं सुचतच नाहीं, तेव्हां ते काय कबूल करितात, तुह्मीं ही कल्पना मनांत आणूं नये. तेव्हां त्यांस ह्मटलें जे तुह्मीं श्रीमंतांचे खैरखाह, आमचे इष्ट आणि ब्राह्मण ह्मणून घरोब्यानें बोललों. या मजकुरांतील भावगर्भ कायम निघाला. जर इंग्रेज सामील होतील तर ते करून घेणार. ते सामील नाहींत, त्याअर्थी उगेंच रहावें, इतकाच प्रकार. अंतःकरण खोटें, हें खरें. र।। छ . २८ जिलकाद.       हे विज्ञापना.