Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१००] श्री.
सदरहू पारशीपत्राचा तरजुमा हिंदवी येणेंप्रमाणें. श्रीमंत खुदावंद न्यामत राव पंतप्रधान यांचें सरकारांतून आह्मांस लिहिलें आलें आहे कीं, एकनवीसंदा तुह्मीं आपलेतर्फेर्नें दिनचर्येची अखबार लिहिण्याकरितां हरका-यांचे जोड्यासुद्धां अलिजाहबहादूर यांचे लष्करात रवाना करून तेथील वर्तमान पैहाम रवाना करीत जाणें. त्यास राव पंतप्रधान यांचें लिहिल्यावरून मुफसल कैफीयतेचा हुजुरात अर्ज केला. इरषाद झाला कीं, बेहत्तर आहे. याजकरितां सखाराम, अनंत यांस हरका-याचे जोड्यासुद्धां पाठविलें आहे. उमेदवार आहे कीं, पंतमशारनिल्हे तेथें राहून पाहिली ऐकिली अखबार दररोजची लिहून पाठवीत जातील. त्याप्रमाणें राव पंतप्रधान यांचे सरकारांत इतल्ला करण्यांत येत जाईल. व सरकारांतून लष्करचे लोकांस अशी ताकीद असावी कीं, कोणी पंतमशारनिल्हे यांस मुजाहीम न होत.